सातारा | वडूज येथे दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडल्याची घटना समोर आली आहे. या घरफोड्यांनी तालुका हदरला असून चोरट्यांनी सुमारे 6 लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. घटनेची माहिती मिळताच वडूज पोलिसांनी घटनास्थळी भेट राहत्या देवून श्वान पथकाला पाचारण केले. श्वान घरापासून काही अंतरावर जावून घुटमळले. दोन्ही घरफोड्यांची वडूज पोलिस ठाण्यात नोंद झाली असून तपास सपोनि मालोजीराव देशमुख करत आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वडूज येथील पेडगाव रोड रस्त्यानजीक भाग्योदय नगरात असणारे कृष्णा करमारे हे दुपारी कामानिमित्त बाहेर गेले होते. याची संधी साधून चोरट्यांनी त्याच्या घराचे कुलूप तोडून घरातील सर्व कपाटे अत्यवस्थ करून कपाटामधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे सुमारे 3 लाख 74 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
तसेच पेडगाव रोड कर्मवीरनगर येथील डॉ. सचिन साळुंखे हे घरातून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये साडे अकरा वाजता गेले. त्यानंतर त्यांनी संध्याकाळी खटाव पाच वाजता घरी येऊन पाहिले तर घराचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता त्यांना घरातील कपाटातील दरवाजे उघडे घरातील साहित्य व अस्ताव्यस्त दिसले. कपाटात असणारी सुमारे अडीच लाखांची रोकड लंपास केली.