जळगाव : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत एकनाथ खडसे (Eknath Khadse) गटाचा पराभव झाला, तर गुलाबराव पाटील आणि गिरीश महाज यांच्या गटाने हि निवडणूक जिंकली. हि निवडणूक झाली तरी अजून नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. खडसे यांच्या (Eknath Khadse) पराभवानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या निवडणुकीनंतर आता भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांकडून एकनाथ खडसे यांच्या पराभावासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे मंगेश चव्हाण यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले मंगेश चव्हाण?
मंगेश चव्हाण यांनी जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. या निवडुकीपूर्वी निवडणुकीपूर्वी मला अनेक राष्ट्रवादीच्या लोकांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की कोणाला सांगू नका, खडसे (Eknath Khadse) राष्ट्रवादीत आल्याने आमचा ताण वाढला आहे. त्यामुळे खडसे यांचा पराभव करा असं मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांचं नाव न घेता म्हटलं आहे. ते ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी कुन्हा गावाता आले असताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
तसेच त्यांनी ईडी कारवाईवरून देखील मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावला आहे. चुकीच्या मार्गाने पैसे कमावल्यास ईडी मागे लागते. ज्यांच्या मागे ईडी लागली त्याचं काय झालं हे सर्वांनी पाहिलं आहे, असं मगेश चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसे (Eknath Khadse) मंगेश चव्हाण यांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या