हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकाला हमीभाव यांसह विविध मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारलं आहे. आज या आंदोलनाचा पाचवा दिवस असून बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक रूप धारण केलं आहे. डवरगावात बच्चू कडू यांच्या कार्यकत्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेतलं. त्यामुळे बच्चू कडू यांचे आंदोलन आणि पेटण्याची शक्यता आहे. तसेच सरकारला सुद्धा या आंदोलनाची दखल घेऊन बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी बेमुदत अन्नत्याग आंदोलन केलं आहे. या आंदोलनाचा आज पाचवा दिवसअसून बच्चू कडू यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. काही ठिकाणी रस्त्यावर जाळपोळ बघायला मिळाली. डवरगावात तर बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी थेट टोकाचे पाऊल उचलत स्वतःला जमिनीत गाडून घेतलं. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन आयोग लागू करावा अशा प्रकारच्या मागण्या करत प्रहारच्या कार्यकर्तांनी स्वतःलाच जमिनीत गाडून घेतलं.
दरम्यान, बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी यापूर्वी मोझरी येथील उपोषणस्थळी भेट देऊन बच्चू कडू याना जाहीर पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही बच्चू कडू यांच्या फोनवरून संवाद साधला. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही बच्चू कडू यांची भेट घेतली. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुद्धा बच्चू कडू याना पाठिंबा दिला. तसेचआझाद समाज पार्टीनेही बच्चू कडू याना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. याशिवाय, खासदार निलेश लंके, रविकांत तुपकर यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनला भेट दिली होती. आज रोहित पवार आणि सलील देशमुख हे सुद्धा मोझरी येथे जाऊन बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत.
बीपी कमी झाला तरी बच्चूभाऊंचा उपचारास नकार –
दरम्यान, पर्वा अचानक बच्चू कडू यांचा बीपी कमी झाला. डॉक्टरांची टीम तातडीने उपोषणस्थळी दाखल झाली, मात्र बच्चू कडू यांनी कोणताही उपचार घेण्यास स्पष्टपणे नकार दिला . जोपर्यन्त मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत मी कोणतेही उपचार घेणार नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बच्चू कडू यांचा रक्तदाब (Blood Pressure) सध्या १८० ते ११० असा आहे. त्यामुळे कमीत कमी तुम्ही बीपीची गोळी तरी घ्या अशी विनंती डॉक्टरांनी बच्चू कडू याना केली, मात्र बच्चू कडू यांनी गोळी घेण्यास नकार दिला आहे.