हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रवासासाठी अनेकदा आपण बसने प्रवास करतो. दगदगीच्या जीवनशैलीमुळे आपल्यापैकी अनेकांना स्वतःसाठी वेळ प्रवासादरम्यान द्यावा लागतो. त्यामुळे आपल्यापैक्की अनेकजण प्रवासात फोनवर बोलताना दिसतात. तर काहीजण गाणे ऐकतात, तर काहीजण फोनद्वारे आपले महत्वाचे काम करताना दिसतात. बरेचजण मोठ्याने आपल्या प्रवाश्यासोबत गप्पा मारतात. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या प्रवाश्यांना त्रास होतो. तसेच अनेकजण ह्या नादात तिकीट कंडक्टरला देखील अनेकदा दाद देत नाहीत. त्यामुळे तिकीट काढण्यासाठी विलंब होतो. कंडक्टर व प्रवाशी ह्या मध्ये वाद होतात. यावर मार्ग म्हणून नवी मुंबई महानगरपालिकाने आपल्या शहरबस सेवेसाठी नवीन नियमावली जारी केली आहे.
या नवीन नियमावलीनुसार मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यास किंवा व्हीडिओ पाहिल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. नवी मुंबईत तुम्ही बसमधून प्रवास करत असाल आणि मोठ्या आवाजात बोलत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे तुम्ही नवी मुंबईच्या शहर बस सेवेमध्ये प्रवास करणार असाल तर ही नियमावली लक्षात ठेवा.अन्यथा तुम्हाला कठोर कारवाईला सामोरे जाऊ लागू शकते.
तुमच्या सवयीमुळे इतरांना त्रास होणार नाही ह्याची काळजी तुम्हाला नवी मुंबईत प्रवास करताना तुम्हाला घ्यावी लागेल. तसेच आवाजामुळे इतरांना होणाऱ्या त्रासाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे जर तुम्ही आवाज करणाऱ्यातले असाल तर तुम्हाला यां नियमाचे पालन करावे लागणार आहे. यामुळे तुमचा प्रवास सुखाचा होऊ शकतो. त्यामुळे नियम पाळा आणि कारवाई टाळा! सध्या तरी हा निर्णय नवी मुंबईत करण्यात आला आहे. परंतु येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात हा नियम लागू होण्याची शक्यता आहे.