Business Idea: तुम्हाला जर कमी पैशात चांगली कमाई करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही घरबसल्या अवघ्या 1 हजार रुपयात व्यवसाय सुरु करू शकता. आज आपण एक बिझनेस आयडियाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याची आजच्या मार्केटमध्ये खूप मागणी आहे. तुम्ही नोकरीसोबत हा व्यवसाय करून कमाई करू शकता.
हा व्यवसाय आहे बटाटा चिप्सचा. आपल्या सर्वाना माहित आहे कि, बटाटा चिप्स सगळ्यांना आवडतो. तुम्ही हा व्यवसाय सहज सुरू करू शकता. तुम्ही हा व्यवसाय तुमच्या एका छोट्या खोलीतून याची सुरुवात करू शकता.
बाजारात अनेक कंपन्या बटाटा चिप्स बनवतात. बटाटा चिप्सचा ब्रँड म्हणून अनेक कंपन्या ओळखल्या जातात. बटाट्याच्या चिप्स घरी बनवून तुम्ही सहज पैसे कमवू शकता. तर हे सगळ कस आहे शक्य जाणून घेऊया सविस्तर…
इतकी करावी लागेल गुंतवणूक –
बटाट्याच्या चिप्स बनवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची मशीन्स उपलब्ध आहेत. सुरुवातीला, तुम्ही फक्त रु.850 पर्यंतचे मशीन खरेदी करून तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. तुमचे उत्पन्न वाढल्यावर तुम्ही त्यात अधिक गुंतवणूक करू शकता. तुमचा व्यवसाय जितका मोठा असेल तितके तुमचे उत्पन्नही मोठे असेल.
यंत्रासह कच्च्या मालासाठी म्हणजे बटाट्यासाठीही तुम्हाला खर्च करावा लागेल. बाजारात जाऊन तुम्ही मोठ्या प्रमाणात बटाटे खरेदी करू शकता. आजच्या काळात ऑनलाइन चिप्स कटिंग मशीनला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. हे मशीन कोणत्याही टेबलावर ठेवून तुम्ही आरामात चिप्स कापू शकता. यामध्ये सगळ्यास खास म्हणजे ही यंत्रे चालवण्यासाठी तुम्हाला विजेची गरज नाही. आपण ते हाताने चालवू शकता.
कुठे विकू शकता हा माल –
आज बाजारपेठेत त्याची मागणी वाढली आहे. लोकांना बटाटा चिप्स खूप आवडतात. तुम्ही स्टॉल किंवा दुकान लावून ते विकू शकता. यासोबतच अशा चिप्स विकणाऱ्या दुकानदारांशीही तुम्ही व्यवहार करू शकता. आजच्या काळात तुम्ही ते ऑनलाइन मार्केटमध्येही विकू शकता.
किती कमाई होईल –
जर तुम्ही एका दिवसात 10 किलो बटाट्याचे चिप्स बनवले तर तुम्ही एका दिवसात हजार रुपये सहज कमवू शकता. याचा अर्थ तुम्ही 7-8 पट जास्त नफा मिळवू शकता. यासाठी तुम्हाला कोणतीही विशेष गुंतवणूक करण्याची गरज नाही.