Business Idea : ‘या’ शेतीद्वारे कमी खर्चात मिळवा 5 पट नफा !!! कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : प्रत्येकाला नोकरी करण्यात रस असतोच असे नाही. अनेकांना नोकरी पेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची ईच्छा असते. मात्र बऱ्याचदा पैशांअभावी तर काही वेळा कोणता व्यवसाय करावा हे माहित नसल्यामुळे ते करता येत नाही. जर आपल्यालाही कमी गुंतवणुकीत मोठा नफा मिळवायचा असेल तर कोरफडीच्या शेतीबद्दल जाणून घ्या. कारण कोरफडीच्या लागवडी द्वारे आपल्याला भरपूर नफा तर मिळतोच त्याबरोबरच यासाठी जास्त खर्च देखील येत नाही.

Aloe Vera Farming Information Guide For Beginners | Agri Farming

जवळपास प्रत्येक घरात कोरफडीची रोपे आढळून येतात. त्वचेसाठी याचा भरपूर वापर केला जातो.आजकाल अनेक मोठमोठ्या कंपन्या देखील कोरफडीचे जेल वापरून सौंदर्य उत्पादने बनवत आहेत. त्यामुळे कोरफडीची लागवड मोठ्या प्रमाणावर करून अशा मोठ्या उत्पादक कंपन्यांना पुरवले तर याद्वारे आपल्याला भरपूर कमाई करता येईल. Business Idea

एलोवेरा की खेती से पूरे साल होती है आमदनी, प्रोसेसिंग यूनिट लगाकर कई गुना बढ़ा सकते हैं कमाई | TV9 Bharatvarsh

कोरफडीच्या बार्बाडन्सी आणि इंडिगो या 2 प्रमुख जाती आहेत ज्यांना बाजारात भरपूर मागणी आहे. कोरफडीच्या लागवडीसाठी खडकाळ जमीन ही उत्तम मानली जाते. तसेच याला पाणी देखील जास्त लागत नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून कोरफडीची पेरणी केली जाते. कोरफडीची पेरणी करताना दोन रोपांमध्ये जवळपास 2 फुटांचे अंतर राखावे. यासाठी युरिया किंवा DAP सारखी खते कधीही वापरू नये. एकदा लागवड केल्यानंतर वर्षातून दोनदा कोरफड काढता येईल. जो विकून चांगला नफा मिळवता येईल. Business Idea

How to start Aloe Vera cultivation

1 एकर जमिनीत आपल्याला जवळपास 12,000 कोरफडीची रोपे लावता येतील. कोरफडीच्या एका रोपाची किंमत 3-4 रुपये असते म्हणजेच 12,000 रोपे लावण्यासाठी 40,000 खर्च येईल. मात्र, आपण त्याच्या पानांना प्रति पान 7-8 रुपये किंमत मिळते. एका कोरफडीच्या रोपामध्ये 15-20 पाने किंवा त्याहूनही जास्त पाने येऊ शकतील. ही पाने विकून किंवा त्यांचे जेल काढून कंपन्यांना जास्त किंमतीला विकता येईल. अशा प्रकारे 1 एकर जमिनीतूनच लाखो रुपये कमावता येतील.

How to start Aloe Vera cultivation

हे पण वाचा :

RBI FD Rules : RBI कडून FD च्या नियमांत बदल, नवीन नियम जाणून घ्या

Banking fraud : बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर बंद झालाय ??? अशा प्रकारे करा अपडेट

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, नवीन दर तपासा

RBI : खुशखबर !!! आता घर दुरुस्त करण्यासाठी देखील मिळणार 10 लाखांपर्यंतचे कर्ज

Business Idea : केसांचा व्यवसाय सुरू करून दर महिन्याला मिळवा भरपूर पैसे

Leave a Comment