हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : जवळपास प्रत्येक घरात दररोज जेवण बनवले जाते. ते बनवण्यासाठी अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात. ज्यामुळे मसाल्यांना वर्षभर मागणी असते. जर तुम्ही एखादा व्यवसाय करायचा विचार करत असाल तर तुम्हांला मसाला बनवायचे युनिट सुरू करता येईल. हे लक्षात घ्या कि, या व्यवसायासाठी जास्त पैसे देखील खर्च करावे लागत नाहीत.
जेवणात मसाल्यांची महत्त्वाची भूमिका आहे. आपल्या देशात लाखो टन विविध प्रकारच्या मसाल्यांचे उत्पादन केले जाते. जर तुम्हाला चवीची चांगली समज असेल आणि मार्केटचे ज्ञान असेल तर मसाले बनवण्याचे युनिट उभारून तुम्ही भरपूर पैसे कमावू शकाल.
किती गुंतवणूक लागेल ???
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) मसाल्याच्या युनिट्सच्या इन्स्टॉलेशनचा खर्च आणि कमाई बाबत एक रिपोर्ट तयार केला आहे. ज्यानुसार मसाला बनवण्याचे युनिट उभारण्यासाठी 3.50 लाख रुपये खर्च येणार आहे. यामध्ये दिलेल्या माहिती नुसार 300 स्क्वेअर फूट इमारतीच्या शेडसाठी 60,000 रुपये लागतील. तसेच मशिन्सची किंमत 40,000 रुपये असेल. याशिवाय काम सुरू करण्यासाठी 2.50 लाख रुपये लागणार आहेत. Business Idea
कच्चा माल आणि यंत्रे कशी खरेदी करायची ???
मसाले बनवण्याचे युनिट सुरु करण्यासाठीचे मशीन जवळपास प्रत्येक शहरात मिळेल. यामध्ये मिरच्या, हळद, धणे इत्यादी बारीक करण्यासाठी मिक्सर ग्राइंडर लागेल. त्यांची किंमत कमी असते. आपल्याला ते ऑनलाइन देखील ऑर्डर करता येईल. मसाल्यासाठी कच्चा माल म्हणून हळद, काळी मिरी, सुकी मिरची, जिरे, धणे यांचा वापर केला जातो. जे दळल्यानंतरच पॅकिंग करून विकले जातात. जे जवळपास प्रत्येक शहरात सहजपणे मिळून जातात. याप्रमाणेच ते मोठ्या प्रमाणात विकण्यासाठी येतात अशा कोणत्याही ठिकाणाहून मिळवता येतील. Business Idea
किती कमाई होईल ???
एका प्रोजेक्ट रिपोर्टनुसार एका वर्षात 193 क्विंटल मसाल्यांचे उत्पादन होऊ शकते. जर 5,400 रुपये प्रति क्विंटलने विकले तर वर्षभरात 10.42 लाख रुपये मिळू शकतील. यामध्ये सर्व खर्च वजा केल्यावर वर्षाला 2.54 लाख रुपयांचा नफा होईल. म्हणजेच एका महिन्यात 21 हजार रुपयांहून जास्त कमाई होईल. या रिपोर्टमध्ये असेही म्हटले गेले आहे की, जर एखाद्या व्यक्तीने हा व्यवसाय आपल्या घरातच सुरू केला तर नफा आणखी वाढेल. घरबसल्या व्यवसाय सुरू केल्याने एकूण खर्च कमी होईल आणि नफा देखील वाढेल. Business Idea
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/
हे पण वाचा :
Stock Market : येत्या 2-3 आठवड्यात दुप्पट कमाई करण्यासाठी ‘या’ शेअर्समध्ये गुंतवा पैसे !!!
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू
Multibagger Stocks : 2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
Bank Alert : खातेदारांना फसवणुकीबाबत सावध करण्यासाठी ‘या’ बँकांनी जारी केली चेतावणी !!!