भरधाव बसची कंटेनरला मागच्या बाजूने धडक, अपघातात 6 ठार, 10 जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तामिळनाडू : वृत्तसंस्था – तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात (accident) झाल्याची घटना समोर आली आहे. या बसने कंटनेरला मागून धडक दिल्यानं बसमधील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर दहा जण गंभीररीत्या जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळाच्या या बसमध्ये अनेक प्रवासी होते. भरधाव वेगात असणाऱ्या बसवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि या बसची डावी बाजू कंटेनरला जोरदार धडकली(accident). यावेळी बसमध्ये डाव्या बाजूला बसलेल्या प्रवाशांना जोरदार फटका बसला आणि त्यामध्ये काही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या अपघानंतर (accident) रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.

कोयंबेडूच्या सीएमबीटी येथूल चिदंबरम इथं ही बस निघाली होती. मात्र सकाळी 7.45 मिनिटांची थोझुपेडू इथं या बसला अपघात (accident) झाला. चेन्नई तिरुची महामार्गावर ही दुर्घटना घडली. या बसच्या डाव्या बाजूचा भाग अपघातामध्ये पूर्णपणे चक्काचूर झाला होता. यावरून हा अपघात किती गंभीर होता ते समजेल. या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी समजताच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती दुःख व्यक्त केले.

या अपघाताची (accident) माहिती मिळाल्यानंतरत पोलिसांनी लगेचच अपघातस्थळी धाव घेतली. जखमींना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कांचिपुरम जिल्ह्यात अपघाताची (accident) भीषण घटना ताजी असतानाच आणखी एका अपघाताने तामिळनाडू हादरलं आहे. गुरुवारी कांचिपुरम इथं दोन कार एका सिमेंट मिक्सरचा विचित्र अपघात झाला होता. या अपघातामध्ये एका चिमुरड्यासह तिघांचा जागीच मृत्यू झाला होता.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?

Leave a Comment