हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : जर आपल्याला व्यवसाय कोणता करावा हा प्रश्न पडला असेल तर सतत वाढ होईल असा व्यवसाय निवडावा. टिश्यू पेपरचा व्यवसाय देखील असाच आहे. कारण सध्या जगभरात टिश्यू पेपर म्हणजेच नॅपकिनचा वापर खूप वाढला आहे. यामुळे त्याची मागणी देखील प्रचंड वाढली आहे. फक्त ब्रँडेडच नाही तर लोकल टिश्यू पेपर्सना देखील सध्या चांगलीच मागणी आहे. त्यामुळे या व्यवसायाद्वारे आपल्याला तर दर महिन्याला भरपूर पैसे मिळवता येतील.
हे लक्षात घ्या कि, कोरोना काळानंतर टिश्यू पेपरचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. हॉटेल्स,हॉस्पिटल्स,शाळा-कॉलेज इ ठिकाणी तर त्यांचा वापर जास्त केला जातो आहे. या कारणास्तव, टिश्यू पेपर प्लॅन्ट सुरु करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. तसेच याचा पुरवठा करून आपल्याला अगदी सहजपणे लाखो रुपये देखील कमवता येतील. चला तर मग टिश्यू पेपरचा प्लांट कसा उभारावा आणि त्यासाठी किती पैसे लागतील हे समजून घेऊयात. Business Idea
मशीनची गरज लागेल
टिश्यू पेपर बनवण्यासाठी आपल्याला एक मशीन घ्यावी लागेल. ज्यासाठी 4-5 लाख रुपये किंवा त्याहून जास्त रुपये लागतील. यामधील सेमी-ऑटोमॅटिक मशिन 5 लाख रुपयांपर्यंत मिळेल. तसेच या मशीनद्वारे आपल्याला दर तासाला 4-5 इंच आकाराच्या टिश्यू पेपरचे 100 ते 500 पीस तयार करता येतील. हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यासाठी जास्त क्षमतेचे ऑटोमॅटिक मशीन घ्यावे लागेल जे 10-11 लाख रुपयांना मिळेल. तसेच याद्वारे आपल्याला दर तासाला 2,500 रोल्स बनवता येतील. Business Idea
मुद्रा योजनेद्वारे मिळेल लोन
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देखील मिळेल. यासाठी 3.50 लाख रुपये जमा करून सरकारी मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेता येऊ शकेल. हे जाणून घ्या कि, मुद्रा योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज केला तर आपल्याला 3.10 लाख रुपयांचे टर्म लोन आणि 5.30 लाख रुपयांचे वर्किंग कॅपिटल लोन मिळेल. Business Idea
किती पैसे मिळतील ???
यामध्ये छोट्या प्लॅन्ट द्वारे 1 वर्षात 1.5 लाख किलो टिश्यू पेपर अगदी सहजपणे तयार करता येईल. तो बाजारात 60-65 रुपये किलो दराने विकता येईल. यानंतर मशिनची किंमत, कच्चा माल, कर्जाचे हप्ते, मजुरी इत्यादी वजा करूनही पहिल्या वर्षीच आपल्याला जवळपास 10-12 लाख रुपये सहजपणे मिळतील.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/
हे पण वाचा :
Sukanya Samrudhi Yojana मध्ये अशा प्रकारे गुंतवणूक करून जमवा मोठी रक्कम !!!
FD मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
PNB ने ग्राहकांना दिला धक्का, आता पेट्रोल-डिझेलच्या डिजिटल पेमेंटवर मिळणार नाही कोणतीही सूट !!!
Post Office मध्ये खातेदारांसाठी ‘हा’ नंबर आहे खूप महत्वाचा !!!