हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : आजपासून देशभरात सिंगल यूझ प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. ज्यामुळे आता प्लॅस्टिकच्या प्लेट्स, स्ट्रॉ, कप आणि चमचे यांसारख्या इतर दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू वापरता येणार नाहीत. आता त्यांची जागा आता कागदापासून बनवलेले प्रॉडक्ट्स वापरले जातील. त्यामुळे आता कागदापासून बनवलेल्या वस्तूंची मागणी वाढेल. जर आपणही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर कागदापासून बनवलेल्या वस्तू तयार करून चांगली कमाई करू शकाल.
हे लक्षात घ्या कि, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त भांडवल देखील लागत नाही. यामध्ये सुरुवातीला थोड्या पैशांची गुंतवणूक करून सुरूवात करता येईल. देशात आधीपासूनच अशा वस्तूंची मागणी खूप जास्त होती. अशातच आता सिंगल युझ प्लास्टिकवर बंदी आल्याने त्यांच्या मागणीत मोठी वाढच होणार आहे. त्यामुळे हा व्यवसाय सुरू करण्याची आता चांगली संधी आहे. Business Idea
अशा प्रकारे सुरू करा व्यवसाय
पेपर कप युनिट तयार करण्यासाठी ज्या मशिन्स लागतात त्यांचा आकार फक्त दोन ते पाच फूट असल्याने त्यासाठी जास्त जागा देखील लागत नाही. या व्यवसायासाठी 2 मशीन्स लागतात. यातली पहिली ऑटोमॅटिक पेपर प्लेट बनवण्याचे मशीन तर दुसरी वेगवेगळ्या आकाराचे कप आणि प्लेट्स बनवण्याचे मशीन. यासाठीच्या छोट्या मशीनची किंमत 80,000 रुपयांपासून सुरू होते. याद्वारे एका दिवसात 10 हजार ते 40 हजार पेपर कप आणि प्लेट्स बनवता येतात.
तसेच या व्यवसायासाठी जास्त कर्मचारी देखील लागत नाही. यामध्ये मशिन चालवण्यासाठी फक्त 2 कामगार लागतात. यामध्ये मशीन चालविण्यासाठी एक अनुभवी व्यक्ती आणि त्याला मदत करण्यासाठी एक मदतनीस लागेल. Business Idea
कच्चा माल
पेपर कप बनवण्यासाठी कच्चा माल आणि मशीन्स अगदी सहजपणे उपलब्ध होतात. यासाठी कच्चा माल म्हणून 5 गोष्टींची आवश्यक आहेत. प्रिंटेड लॅमिनेटेड पेपर ब्लाइंड, लॅमिनेटेड पेपर ब्लाइंड, सन्मिका पेपर ब्लाइंड, बॉटम रील आणि पॅकिंग मटेरियल. हे साहित्य कोणत्याही मोठ्या शहरात सहजपणे मिळते. याशिवाय ते ऑनलाइन देखील खरेदी करता येते. Business Idea
किती खर्च येईल ???
ऑटोमॅटिक स्मॉल पेपर कप मेकिंग मशिन्सची किंमत 80 हजार रुपयांपासून सुरू होते. याशिवाय जमीन, कर्मचारी, सेटअप यावर खर्च होईल. एका अंदाजानुसार, एक चांगला पेपर कप प्रॉडक्टचा बिझनेस सेटअप 5 लाखांपासून सुरू होतो आणि नंतर तो हळूहळू वाढवता देखील येतो. Business Idea
किती कमाई होईल ???
ऑटोमॅटिक मशिनद्वारे दररोज सुमारे 40,000 पेपर कप-प्लेट्स बनवता येतात. हे ध्यानात घ्या कि, एक पेपर कप किंवा प्लेट बनवण्यासाठी 20 पैसे खर्च येतो. त्यानुसार आठ हजार रुपये खर्च केले जातील. सहसा ते 10 पैशांच्या नफ्यावर विकले जातात. अशा प्रकारे, ते 12,000 रुपयांना विकले तर 4 हजार रुपयांचा नफा होईल. यामधील कमाई ही आपले प्रॉडक्ट्स आणि विक्री यावर अवलंबून असते. यामध्ये जितकी जास्त विक्री केली जाईल तितकी जास्त कमाई होईल. या व्यवसायातून एका महिन्यात 60 हजार रुपये सहजपणे मिळतील. Business Idea
सरकार कडून मिळेल मदत
पेपर कप मॅन्युफॅक्चरिंग युनिट इन्स्टॉल करण्यासाठी केंद्र सरकारच्या मुद्रा योजने अंतर्गत 75% कर्ज देखील मिळेल. या योजनेअंतर्गत एकूण खर्चाच्या 25% रक्कम स्वतः गुंतवावी लागेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/
हे पण वाचा :
ICICI Bank कडून कर्ज घेणे महागले, बँकेने MCLR मध्ये केली 20 बेसिस पॉईंटची वाढ
Gold Price Today : आयात शुल्कात वाढ झाल्याने सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे नवीन भाव तपासा
Income Tax : आजपासून लागू झाले ‘हे’ मोठे आर्थिक बदल
James Anderson ने घरच्या मैदानावर भारताविरुद्ध पूर्ण केले बळींचे शतक !!!
ICICI Bank कडून कर्ज घेणे महागले, बँकेने MCLR मध्ये केली 20 बेसिस पॉईंटची वाढ