हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : सध्या महागाई प्रचंड वाढली आहे. अशातच डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांच्या घरचे बजटच बिघडवले आहे. तसेच सध्या सीएनजीही महागले आहे. यामुळेच आता लोकांचा इलेक्ट्रिक व्हेईकलकडे कल वाढतो आहे. तसेच इलेक्ट्रिक व्हेईकल प्रदूषणही होत नाही आणि पैशांचीही बचत होते. आता तर रस्त्यावर ई-रिक्षा देखील दिसून येत आहेत. यामुळे जर भविष्याकडे पहिले तर इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन हा आपल्या उत्पन्नाचा एक चांगला स्रोत बनू शकेल.
भांडवल किती लागेल ???
जर आपल्याकडे योग्य ठिकाणी जागा असेल तर फक्त 1 लाख रुपयांमध्ये इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचा व्यवसाय सुरू करता येईल. त्यासाठी हैदराबादच्या इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग मॅनेजमेंट सॉफ्टवेअरच्या मदतीने चार्जिंग स्टेशन सुरू करता येईल. जर आपल्याला हा व्यवसाय उच्च क्षमतेचे चार्जर बसवून मोठ्या प्रमाणावर सुरू करायचा असेल तर त्यासाठी खर्च 40 लाख रुपयांपर्यंत येऊ शकेल. Business Idea
फास्ट चार्जिंगसाठी जास्त खर्च
हे लक्षात घ्या कि, एसी स्लो चार्जरची किंमत जास्त नाही, मात्र डीसी फास्ट चार्जरची किंमत खूप जास्त आहे. एका डीसी चार्जरची किंमत त्याच्या क्षमतेनुसार 1 लाख ते 15 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकेल. तसेच एका ए.सी. चार्जरची किंमत 20,000 ते 70,000 रुपये असू शकेल. Business Idea
परमिटची गरज नाही
चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी कोणतेही परमिट लागत नाही. तसेच कोणत्याही परवानगीशिवाय आपल्याला पब्लिक चार्जिंग स्टेशन सुरू करता येईल. चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी, तंत्रज्ञान, सुरक्षा, परफॉर्मन्स स्टॅंडर्ड आणि काही प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल.
अनुदानही मिळेल
सामान्यतः चार्जिंग स्टेशन दोन प्रकारच्या ईव्ही चार्जिंगसाठी येतील. यातील पहिला प्रकार म्हणजे बॅटरी इलेक्ट्रिक व्हेइकल्स (BEVs). यामध्ये कोणत्याही प्रकारचे गॅस इंजिन नसते. अनेक BEV मध्ये फास्ट आणि सोपी चार्जिंग सिस्टीम असते. तसेच, यातील दुसरा प्रकार म्हणजे प्लग-इन हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेइकल्स (PHEV). या प्रकारच्या वाहनात मोठी बॅटरी आणि इलेक्ट्रिक मोटर असते. ज्यामध्ये चार्जिंग आउटलेट तसेच गॅसची टाकी असते. यासाठी L2 चे रिचार्ज चार्जर वापरले जातात. हे लक्षात घ्या कि, चार्जिंग स्टेशन्स सुरु करण्यासाठी सरकारकडून अनुदान देखील मिळेल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://e-amrit.niti.gov.in/charging-map
हे पण वाचा :
SBI कडून ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकड्न कर्ज घेणे महागले
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 271 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, जाणून घ्या आजचे नवीन भाव
Multibagger Stocks : 2022 मध्ये ‘या’ 5 कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल, दिला 2,481% पर्यंत रिटर्न
AU Small Finance Bank : देशातील ‘या’ सर्वात मोठ्या स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या व्याजदरात केली वाढ