SBI कडून ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकड्न कर्ज घेणे महागले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आता यामध्ये SBI चेही नाव सामील झाले आहे. ग्राहकांना मोठा धक्का देत या बँकेने वेगवेगळ्या कालावधीतील MCLR 25 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे. आता बँकेकडून कर्ज घेणे महाग होणार आहे. एसबीआयच्या वेबसाइट वरील माहितीनुसार, आता बँकेचा एक वर्षाचा MCLR वाढून 8.30 टक्के झाला आहे.

SBI customers will now have to enter OTP to access their account online |  Business News,The Indian Express

कोणत्या कालावधीसाठी किती व्याज असेल ???

बँकेकडून अल्प मुदतीच्या कर्जावरील व्याजदरातही वाढ करण्यात आली आहे. यामध्ये ओव्हरनाईट ते 6 महिन्यांपर्यंतचा कालावधी समाविष्ट आहे. आता या मुदतीच्या कर्जासाठी MCLR 7.85 टक्के ते 8.30 टक्क्यांपर्यंत असेल. याशिवाय दोन वर्षांच्या कर्जासाठीचा MCLR 8.50 टक्क्यांवर तर तीन वर्षांच्या कर्जाचा दर 8.60 टक्क्यांवर पोहोचला आहे.

6 महिन्यांत कर्ज 1.10 टक्क्यांनी महागले

एसबीआयने या वर्षी जूनपासून MCLR मध्ये 1.10 टक्क्यांनी वाढ केली आहे, त्यात डिसेंबरमध्ये 0.25 टक्के व्याजदर वाढीचा समावेश आहे. बँकेने वितरित केलेल्या कर्जाच्या 75% वर फ्लोटिंग व्याज दर लागू होतात. यापैकी 41 टक्के कर्जे अजूनही MCLR शी जोडलेली आहेत. उर्वरित 59 टक्के कर्जांवर बाह्य बेंचमार्क दर लागू आहेत. बाह्य बेंचमार्क म्हणजे रेपो दर किंवा ट्रेझरी बिल दर. MCLR हा बँकेच्या अंतर्गत खर्चाशी जोडलेला दर आहे.

SBI Urges Customers To Report Unauthorised Transactions Immediately to  Check Cybercrime

जास्त EMI द्यावा लागणार

MCLR मध्ये वाढ झाल्याने आता टर्म लोन वरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतेक ग्राहक कर्जे ही एका वर्षाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटवर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे पर्सनल, ऑटो आणि होम लोन महागतील.

जर एखाद्याने 20 वर्षांसाठी SBI कडून 8.25% दराने 30 लाख रुपयांचे होम लोन घेतले असेल आणि त्याचा सध्याचा EMI 25,562 रुपये असेल, तर कर्जाच्या संपूर्ण कालावधीसाठी त्याला 31,34,876 रुपये व्याज म्हणून द्यावे लागतील. आता 25 बेसिस पॉइंट्स वाढल्यानंतर प्रभावी व्याजदर 8.50 टक्के होईल. या प्रकरणी ईएमआय 26,035 रुपये होईल. म्हणजेच आपल्याला दरमहा 473 रुपये तर एका वर्षात 5,676 रुपये जास्त EMI भरावे लागतील.

RBI hiked repo rate by 50 bps to 5.40% to counter inflation |

MCLR काय असते ???

MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्या आधारावर बँकांकडून कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. या आधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठीचे व्याजदर निश्चित करत असत.

RBI ने रेपो दरात केली वाढ

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. SBI

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/interest-rates/interest-rates/mclr

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, जाणून घ्या आजचे नवीन भाव
भारतात Oppo A58x 5G स्मार्टफोन लॉन्च, आता कमी किंमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स
Multibagger Stocks : 2022 मध्ये ‘या’ 5 कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल, दिला 2,481% पर्यंत रिटर्न
AU Small Finance Bank : देशातील ‘या’ सर्वात मोठ्या स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या व्याजदरात केली वाढ
Business Idea : फक्त 1000 रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे ‘या’ व्यवसायातून भरपूर उत्पन्न