Business Idea : फक्त 1000 रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे ‘या’ व्यवसायातून भरपूर उत्पन्न

Business Idea
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : जर आपल्याला एखादा व्यवसाय करायचा असेल आणि फळांची आवड असेल तर आजची ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. कर आज आपण पपईच्या फळाद्वारे करता येणाऱ्या व्यवसायाविषयी जाणून घेउयात. पपईचे फळ हे बारमाही फळ आहे, जे कोणत्याही ऋतूत अगदी सहजरित्या उपलब्ध होते. मात्र मार्केटमध्ये विक्रीसाठी नेताना पपई अनेकदा ते खराब होण्याची भीती असते. ज्यामुळे असे होऊ नये म्हणून पपईवर प्रक्रिया करून त्याच्यापासून जॅम, जेली, मार्मालेड, टुटीफ्रुटी, पेपेन सारखे पदार्थ बनवून अनेक पदार्थ बनवून त्याची विक्री करता येईल. तसेच त्याची निर्यात करूनही आपल्याला चांगला नफा देखील मिळू शकेल.

8 Evidence-Based Health Benefits of Papaya

पपई शरीराला गरम असल्‍याने वातावरणात गारवा असताना खाणे हितकारी आहे. याशिवाय पपईमध्‍ये जीवनसत्त्व सी आणि तंतुमय पदार्थांचे प्रमाणही जास्त असल्‍याने रक्‍तवाहिन्‍यांमधील कोलेस्‍टेरॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. चवीला गोड शरीराला पोषक आणि त्‍वचेचे आरोग्‍य सुधारणारे फळ म्हणूनही पपईला खूप महत्व आहे. एका मध्‍यम आकाराच्‍या पपईमध्‍ये 120 कॅलरीज असतात. पपईमध्ये असणाऱ्या डायटरी फायबरमुळे पचनक्रिया चांगली राहते. तसेच यामुळे पचनशक्‍ती वाढवण्‍यासही मदत होते. शरीरातील प्रथिनांच्‍या पचनासाठी पपईमधील पेप्‍सीन हा घटक मदत करतो. Business Idea

Papaya Fruit: 3 Health Benefits and 5 Recipes

पपईमध्‍ये जीवनसत्त्व ए आणि सी मुबलक प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांचे आरोग्‍यही चांगले राहते. यामधील अ‍ॅन्‍टी ऑक्‍सिडन्‍ट, बीटा कॅरोटीन आणि जीवनसत्त्व इ आणि सी मुळे चेहरा चमकदार तर होतोच त्याचबरोबर हे सुरकुत्‍या देखील कमी करते. पपईच्या याच गुणधर्मांमुळे याचा वापर अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्‍ये देखील केला जातो. Business Idea

Farmers make papaya candy and tutti frutti at home and earn a lot | घर पर  ही पपाया कैंडी और टूटी फ्रूटी बनाकर अच्छा पैसा कमा सकते हैं किसान, जानें  कैसे |

पपईपासून अशा प्रकारे बनवा टुटीफ्रुटी

1 किलो कच्या पपईच्‍या गराचे चौकोनी टुकडे कापून घ्‍यावेत.
अर्धा लिटर पाण्‍यामध्‍ये 4 टी स्‍पून चुना मिसळून त्‍यामध्‍ये पपईचे तुकडे अर्धा तास ठेवावे.
तुकडे दुस-या पाण्‍यात 2 ते 3 वेळा धुवून पांढ-या मलमलच्‍या कापडात बांधून 3 ते 5 मिनिटे वाफवून घ्‍यावे. त्यानंतर थोडावेळ थंड पाण्‍यात ठेवावे.
एक किलो साखरेचा एकतारी पाक करून गाळून घ्‍यावा व त्‍यामध्‍ये हे तुकडे पूर्ण एक दिवस ठेवावे.
तुकडे वेगळे करून पाक दोनतारी होईपर्यंत उकळावा व उकळताना त्‍यामध्‍ये सायट्रिक अ‍ॅसिड मिसळावे.
पाक गाळून घेऊन थोडा थंड झाल्‍यावर त्‍यामध्‍ये तुकडे व आवडीनुसार रंग घालुन मिसळावे व हे मिश्रण 2 ते 3 दिवस ठेवावे.
तुकड्यांमध्‍ये पाक चांगला शिरल्‍यावर ते तुकडे बाहेर काढून वाळवावेत. तयार झालेली टुटीफ्रुटी बरणीत भरुन ठेवावी. Business Idea

मार्केटिंग कशी करावी ???

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अत्यंत कमी पैशांची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे या मार्केटिंगसाठी देखील जास्त खर्च करण्याची गरज नाही. यासाठी आपल्याला फक्त आइस्क्रीम बनवली जाणारी फॅक्टरी आणि बेकरी अशा ठिकाणी मार्केटिंग करावे लागेल. यासोबतच आपल्याला आपले उत्पादन ऑनलाइनही विकता येईल. Business Idea

Want to control your spending? Try the 30-Day Rule | Mint

किती नफा मिळेल ???

या व्यवसायात भरपूर नफा मिळतो. उदाहरणार्थ, जर आपण एक किलो पपई विकत घेतली तर त्याची किंमत 40 रुपये आहे आणि साखर 40 रुपये किलोने घेतली आणि 10 रुपयांमध्ये रंग घेतला. आता जर आपण एक किलो माल बनवला तर एक किलो बनवण्यासाठी 85 रुपये खर्च येईल. यानंतर ते 200 रुपये प्रति किलो दराने बाजारात विकता येऊ शकेल. तसेच जर आपण दिवसाला 20 किलो विकून 100 रुपयांचे मार्जिन मिळवले तरीही दररोज 2000 रुपयांचा फायदा होऊ शकेल. Business Idea

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/

हे पण वाचा :
Union Bank of India कडून ग्राहकांना धक्का, होमलोनवरील EMI वाढणार
Train Cancelled : रेल्वेकडून आज 271 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Stock Tips : आगामी काळात ‘हे’ 5 स्टॉक देऊ शकतील मोठा रिटर्न, आपल्या प्रोफोलिओमध्ये आजच करा समावेश
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमती वधारल्या, आजचे दर तपासा
Indian Overseas Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, FD वर मिळणार जास्त व्याज