Union Bank of India कडून ग्राहकांना धक्का, होमलोनवरील EMI वाढणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Union Bank of India : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आता यामध्ये Union Bank of India चेही नाव सामील झाले आहे. ग्राहकांना मोठा धक्का देत या बँकेने वेगवेगळ्या कालावधीतील MCLR 5 बेस पॉइंट्सने वाढवला आहे. आता बँकेकडून कर्ज घेणे महाग होणार आहे. बँकेचे नवीन दर 11 डिसेंबर 2022 पासून लागू होतील.

Union Bank hikes MCLR by 5 bps, home loan interest rates revised | Mint

यानंतर आता MCLR बेंचमार्क 7.50% ते 8.60% असेल. 10 जानेवारी 2023 पर्यंत हे नवीन व्याजदर सुरू राहतील. याव्यतिरिक्त, बँकेने रेपो रेटशी जोडलेले बाह्य बेंचमार्क कर्ज दर सुधारित केले आहेत.

बँकेच्या वेबसाइटनुसार, 11 डिसेंबरपासून लागू होणारा 3-वर्षांचा MCLR दर 8.60% आहे तर 2-वर्ष आणि 1-वर्षांच्या कालावधीसाठी MCLR अनुक्रमे 8.45% आणि 8.25% असेल. तसेच बँक आता सहा महिन्यांसाठी 8.05% तर दर 3 महिन्यांसाठी 7.85%, एका महिन्यासाठी 7.65% आणि ओव्हरनाईटसाठी 7.50% MCLR ऑफर करत आहे. याशिवाय, 11 डिसेंबरपासून, बाह्य बेंचमार्क दर 9.05% असेल.

जास्त EMI द्यावा लागणार

MCLR मध्ये वाढ झाल्याने आता टर्म लोन वरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतेक ग्राहक कर्जे ही एका वर्षाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटवर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे पर्सनल, ऑटो आणि होम लोन महागतील.

State-owned lenders raise MCLR, month after third repo rate hike | Business  Standard News

MCLR काय असते ???

MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्या आधारावर बँकांकडून कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. या आधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठीचे व्याजदर निश्चित करत असत. Union Bank of India

RBI hiked repo rate by 50 bps to 5.40% to counter inflation |

RBI ने रेपो दरात केली वाढ

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.Union Bank of India

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.unionbankofindia.co.in/english/interestrates-loansadvances.aspx

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे