हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : सध्याच्या काळात लग्न, वाढदिवस, प्रमोशन अशा अनेक प्रसंगी पार्ट्या देण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. ज्याचा कल आता मोठ्या शहरांपासून छोट्या शहरांमध्येही वाढतो आहे. यामुळे इव्हेंट मॅनेजमेंटच्या व्यवसायाच्या झपाट्याने विस्तार होऊ लागला आहे. वर्षातून अनेकदा असे कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा परिस्थितीत, जर आपल्याला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा एक चांगला पर्याय ठरू शकेल.
हे लक्षात घ्या कि, कोणत्याही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडून पार्टीला येणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार होस्टकडून पैसे घेतले जातात. याशिवाय इव्हेंट मॅनेजमेंट फर्म सुरू करण्यासाठी जास्त पैशांची गुंतवणूक देखील करण्याची गरज नाही. या व्यवसायात भरपूर पैसे देखील मिळतात. चला तर मग या व्यवसायाशी संबंधित महत्वाची जाणून घेउयात…
इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे काय ???
कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी पार्टी दिली जाते. अशा प्रसंगी मित्र आणि नातेवाईक देखील सहभागी होतात. यामध्ये पार्टी देणारी व्यक्तीकडून त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांवर सोपवली जाते. जर आपण हा व्यवसाय सुरू केला तर आपल्याला संपूर्ण कार्यक्रमाचे योग्यरित्या व्यवस्थापन करावे लागेल. उदाहरणार्थ, जर वाढदिवसाची पार्टी असेल तर यासाठीची सजावट, केक, जेवण हे सर्व आपल्यालाच म्हणजे करावे लागेल. त्याचप्रमाणे जर लग्न सोहळा असेल तर यामध्ये घोड्यापासून ते दिवे, लग्नाचा हॉल, स्टेज, डीजे, खाण्यापिण्याची व्यवस्था करावी लागेल. यामध्ये होणाऱ्या खर्चासोबतच आपला नफाही जोडावा लागेल. Business Idea
अशा प्रकारे सुरू करा हा व्यवसाय
इव्हेंट मॅनेजमेंट फर्म सुरू करण्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंटचा अनुभव असणे आवश्यक आहे. यासाठी सुरुवातीला आपल्या घरातीलच इव्हेंट्स आणि छोट्या पार्ट्यांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी घेता येईल. अशा प्रकारे, आपला पोर्टफोलिओ तयार करून हळूहळू मोठ्या कार्यक्रमांसाठी ऑर्डर घ्यायला सुरूवात करावी लागेल. यानंतर जसजसे आपले नेटवर्क तयार होत जाईल तसतशी नियमित ऑर्डर देखील मिळू लागतील. Business Idea
अशा प्रकारे मिळेल मोठा नफा
इव्हेंट मॅनेजमेंटच्या व्यवसायामध्ये प्रचंड नफा कमावण्याची संधी मिळते. जेव्हा जेव्हा लग्न किंवा पार्टीसाठी ऑर्डर मिळते तेव्हा तेव्हा सदर क्लायंटच्या आवडीनुसार कर्यक्रमाचे योग्यरीत्या नियोजन देखील करावे लागेल. यामध्ये आपल्या इच्छेनुसार पैसे आकारण्याचे स्वातंत्र्य मिळते. तसेच यामध्ये क्लायंटकडून ऍडव्हान्स पैसे घेऊन तंबू, डीजे, केटरिंगची व्यवस्था करता येईल. म्हणजेच यामध्ये आपल्या खिशातून काहीही खर्च करावा लागणार नाही. अशा प्रकारे आपल्याला चांगला नफा देखील मिळेल. Business Idea
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/
हे पण वाचा :
Airtel ची भन्नाट ऑफर, ग्राहकांना मिळणार अनलिमिटेड 5G डेटा
Home Insurance द्वारे अशा प्रकारे मिळेल आपल्या घरातील नुकसानीची आर्थिक भरपाई
Realme C35 स्मार्टफोनवर मिळवा आतापर्यंतची सर्वात स्वस्त ऑफर, फीचर्स तपासा
रोखीने व्यवहार करत असाल तर वेळीच व्हा सावध अन्यथा मिळेल Income tax डिपार्टमेंटची नोटीस
Success Story : शालेय शिक्षण अर्धवटच सोडणारा ‘हा’ व्यक्ती बनला अब्जाधीश; स्थापन केली 16,500 कोटींची कंपनी