नवी दिल्ली : वृत्तसंस्था – असे काही तरुण तरुणी आहेत जे मोठ्या पगाराची नोकरी सोडून यशस्वीरित्या बिझनेस करतात. त्यांची कहाणी नेहमीच आपल्याला प्रेरणा देत असतात. आजकाल बहुतेक लोक नोकरी सोडून बिझनेस करण्याच्या मार्गावर आहेत. पण बिझनेस करायचा म्हंटलं कि त्यासाठी उत्तम आयडीया असणे पण तितकेच महत्वाचे आहे. अशीच एक बिझनेस आयडिया एका तरुणीला सुचली आता त्याच बिझनेसमधून हि तरुणी लाखोंची कमाई करत आहे. या तरुणीचे नाव आहे दिशा सिंग. दिशा सिंग एकदा एका ट्रिपला गेली असताना तिला बिझनेस आयडीया आली आणि त्याच कल्पनांनी तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. तिचा हा बिझनेस इतका चालला कि आता तिच्या कंपनीची उलाढाल कोट्यवधीपर्यंत पोचली आहे.
कशी आली बिझनेस आयडिया ?
दिशा सिंग या तरुणीने आयआयएम अहमदाबाद या ठिकाणी शिक्षण घेतले आहे. जेव्हा दिशा सिंग दुसऱ्या वर्षाला होती तेव्हा ती कच्छला फिरण्यासाठी गेली होती. तेव्हा तिला लोकल हस्तकलेला एक्सप्लोअर करण्याची एक आयडिया तिला सुचली. यावरून तिने एक व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. यानंतर तिने 2016 मध्ये Zouk च्या माध्यमातून बॅग, पर्स आणि इतर सामानाला क्राफ्ट करत आधुनिक आणि आकर्षक बनवण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच एकदम सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तिने गुजरातमध्ये विकायला असलेल्या क्राफ्टच्या सामानाला नव्या पद्धतीने आणि नव्या डिझाइनसह विकण्यास सुरूवात केली.
हे करत असताना तिच्या लक्षात आले कि तिचे सामान परदेशी ब्रँडसारखे आहे आणि त्यामुळे तिने आणखी वस्तू बनवण्यास सुरुवात केली. यामध्ये खादी आणि इत्यादींनी बनवलेल्या पिशव्यांचे कामही सुरू झाले. तिने सुरुवातीला या बिझनेसमध्ये तब्बल 20 लाख रुपयांची गुंतवणूक केली. यानंतर तिने 2017 मध्ये जॉकचे पहिले उत्पादन लॉन्च केले. यानंतर तिने या व्यवसायाला ऑनलाईन सुरू केले. यामुळे तिच्या व्यवसायाला अजून गती मिळाली. आज, दिशासोबत अनेक लोक काम करत असून तिच्या उत्पादनास मोठी मागणी येत आहे. या व्यवसायामध्ये सध्या तिच्या कंपनीची 5 कोटींहून अधिक उलाढाल झाली आहे.