धोनीच्या ‘या’ तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा ; आनंद महिंद्रा यांनी केली धोनीची स्तुती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक, वन-डे विश्वचषक आणि चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकली होती.धोनीच्या निवृत्तीनंतर जगभरातुन त्याच्यासाठी शुभेच्छा आणि आभार व्यक्त होत आहे.धोनीची दखल सर्वच क्षेत्रातील व्यक्ती घेत आहेत.अशातच प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यानी धोनीची स्तुती करताना 1 ट्विट केलं आहे.

या ट्विटमध्ये महिंद्रा यांनी म्हटले आहे की, ” माझ्या आईने पहिल्यांदा धोनीला टिव्हीवर पाहिले आणि धोनीची हेअरस्टाईल मला दाखवली होती. आतापर्यंत धोनीबद्दल बरेच काही म्हटले गेले आहे. धोनीवर भाष्य करण्यासाठी मी काही क्रिकेटमधील तज्ञ नक्कीच नाही. पण धोनीच्या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवाव्या अशाच आहे. पहिली गोष्ट म्हणजे धोनी हा अतिशय प्रमाणिक क्रिकेटपटू होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्याने बऱ्याचदा जोखीम पत्करली होती आणि  तिसरी गोष्ट म्हणजे तो आपल्या निर्णयांवर ठाम असायचा.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’