Bamboo Farming | आजकाल शेती हा व्यवसाय झपाट्याने वाढताना दिसत आहे. अनेक तरुणांचा कल हा शेतीकडे वळताना दिसत आहे. तरुण नोकरी सोडून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. तसेच त्यातून त्यांना खूप चांगले उत्पन्न देखील मिळत आहे. तुम्ही जर शेती करण्याचा विचार करत असाल, ज्यातून तुम्हाला खूप चांगली कमाई होईल. तर यासाठी आम्ही तुम्हाला कल्पना सांगत आहोत ज्यातून तुम्ही खूप चांगली शेती करू शकता. आज-काल भारतात बांबूची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. बांबू (Bamboo Farming) या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार देखील नवनवीन योजना आणत आहोत. आता आपण तुम्ही कमीत कमी पैसे खर्च करून खूप चांगली कमाई.
बांबूची लागवड ही आता एक चांगला व्यवसाय मानला जातो. दुसऱ्याच्या जमिनीवरही तुम्हाला बांबूची लागवड करता येते. अगदी ओसाड जमिनीवर देखील तुम्ही बांबूची लागवड करून खूप चांगली कमाई करू शकता. यासाठी जास्त पाण्याची देखील गरज लागत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा बांबूची लागवड केली की पुढील 50 वर्षे या बांबूचे उत्पादन सुरू राहते. त्यामुळे तुम्हाला जास्त मेहनत देखील करावी लागत नाही.
बांबूची लागवड कशी करावी?
भारताच्या पूर्वेकडील भागात बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यामध्ये आता एक हेक्टर जमिनीवर सुमारे 3000 बांबूची रोपे लावली जाऊ शकतात. यासाठी तुम्हाला एका रोपापासून दुसऱ्या रोपाचे अंतर 2.5 मीटर आणि रेषेचे अंतर 3 मीटर एवढे ठेवावे लागेल.
कोणत्या वाणांची निवड करावी ? | Bamboo Farming
बांबूची चांगली शेती यावी यासाठी तुम्हाला सुधारक वाहनांची निवड करणे खूप गरजेचे असते. त्यामुळे तुम्हाला चांगली शेती करता येईल. यामध्ये तुम्ही किमोनोबाम्बुसा फाल्काटा, मेलोकाना बैसीफेरा, डेंड्रोकैलामस स्ट्रिक्स, बैम्बुसा पॉलीमोर्फा, डेंड्रोकैलामस हैमिल्टन और बैम्बुसा ओरैंडिनेसी या वाणांची निवड करणे गरजेजे आहे.
शासन किती अनुदान देते ?
राष्ट्रीय बांबू मिशन आणि बांबूच्या लागवडीवर आता सरकार जास्त पैसा खर्च करणार आहे. केंद्र सरकार देखील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार आहे. बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान मिळत आहे. तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सबसिडीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
किती लाभ होईल ? | Bamboo Farming
बांबूची लागवड केल्यानंतर 4 वर्षांनी बांबूची कापणी होते. त्यामुळे बांबूची लागवड केल्यास 4 वर्षांमध्ये 40 लाख रुपयांचे उत्पादन मिळते. त्यामुळे तुम्ही जास्त खर्च न करता खूप चांगली कमाई करू शकता.