महाराष्ट्रातील याठिकाणी आहे “बटरफ्लाय बीच”; ज्याच्यासमोर अख्खा गोवा पडतो फिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गोव्याची ओळखच त्यांच्याकडे असलेल्या बिचेसमुळे आहे. महाराष्ट्रातील पर्यटन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गोव्याला भेट देण्यासाठी जात असतात. अनेकजण तर फक्त गोव्यामध्ये असलेले बीच पाहण्यासाठी जातात. परंतु, गोव्यावर ही भारी पडेल असे एक बीच महाराष्ट्रमध्ये आहेत. या बीचला भेट देण्यासाठी लोक लांबून येतात. खास म्हणजे, या बीचला बटरफ्लाय बीच म्हटले जाते. त्यामुळे यंदाच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही या बीचला भेट देण्याचा प्लॅन नक्की करू शकतो.

कोकणातील सौंदर्य आणि तेथील खाद्य संस्कृतीविषयी आजवर आपण ऐकतच आहोत. याचं कोकणातील कशेळी गावात कनकादित्याचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर कोकणातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठे देवस्थान आहे. या कशेळी गावाला सुंदर असा समुद्रकिनारा ही लाभला आहे. याचं किनार्‍यावरील कड्यावर सुमारे 15 फूट उंचीवर, 40 चौ. फुटांची एक नैसर्गिक गुहा आहे. या गुहांमध्ये गावकऱ्यांना कनकादित्याची मूर्ती सापडली होती. पुढे या मूर्तीसाठी त्यांनी मोठे देऊळ उभारले. हेच देऊळ कोकणवासीयांचे श्रद्धास्थान आहे.

सर्वात खास गोष्ट म्हणजे, कशेळी गावातच देवघळी बीच आहे. या बीचला कशेळी बीच (Kasheli Beach) आणि बटरफ्लाय बीच (Butterfly Beach) देखील म्हटले जाते. या बीचपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना सर्वात अगोदर डोंगर उतरून समुद्र किनाऱ्यावर पोहोचावे लागते. कारण की, हा समुद्रकिनारा दोन डोंगरांच्या कपारीमध्ये आहे. याठिकाणी आल्यानंतर तुम्हाला लांबपर्यंत फक्त समुद्र दिसतो. यासह तुम्हाला बटरफ्लाय बीच ही पाहता येते. या बिचचा आकारात बटरफ्लायसारखा असल्यामुळे त्याला बटरफ्लाय असे म्हटले जाते.

कशेळी बीच गोव्यातील अतिशय सुंदर आणि नितळ समुद्र किनारा आहे. सध्या याच बीचवरील सनसेट पॉईंटला टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून पर्यटकांकडून पसंती मिळत आहे. या पॉईंटवर गेल्यानंतर निळ्याशार समुद्राचे विहंगम दृश्य पहायला मिळते. हे दृश्य पाहून आपल्याला गोव्यातील समुद्रकिनारेही फिके वाटतात.