नवी दिल्ली । डिझेल-पेट्रोलच्या सतत वाढत चाललेल्या किंमती मुळे आजकाल इलेक्ट्रिक गाड्या लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. इलेक्ट्रिक वाहन हे विशेषत: इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालवले जाणारे वाहन आहे ज्याची संकर्षण ऊर्जा (traction energy) वाहनात विशेष स्थापित केलेल्या ट्रॅक्शन बॅटरीद्वारे पुरविली जाते. दरम्यान, अनेक बँका अशा इलेक्ट्रिक वाहनांसाठी आकर्षक दराने कर्ज देत आहेत. इलेक्ट्रिक कारच्या खरेदीसाठी कर्ज देणार्या बँकांवर एक नजर टाकूयात.
SBI ग्रीन लोन
सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी देशातील पहिले ग्रीन कार लोन सुरू केले होते. यामध्ये, व्याज दर सध्याच्या कार लोन योजनेच्या दरापेक्षा 20 बेसिक पॉइंटने कमी आहे. SBI वेबसाइटनुसार, ऑन-रोड किंमतीच्या 90 टक्के ते 100 टक्के निवडक मॉडेल्सवर उपलब्ध असतील. ग्रीन कार लोनचे व्याज दर 7.05% ते 7.75% पर्यंत आहेत. याशिवाय युनियन बँक इलेक्ट्रिक वाहनांसाठी आकर्षक व्याजदरावर कर्जही देत आहे. त्याच वेळी, एक्सिस बँक पगारदार व्यक्ती आणि खाजगी व्यवसाय चालवणाऱ्या ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनाच्या रस्त्याच्या किंमतीच्या 85 टक्क्यांपर्यंत कर्ज देत आहे.
कार लोनवर लिमिट नाही
नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर खरेदी करण्यासाठी तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंतचे लोन घेऊ शकता मात्र कारवर कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही नवीन इलेक्ट्रिक 4-व्हीलरसाठी 84 महिन्यांत कर्जाची परतफेड करू शकता तर नवीन इलेक्ट्रिक 2-व्हीलरसाठी 36 महिन्यांपासून ते 60 महिन्यांपर्यंतची श्रेणी आहे.
उद्देश काय आहे ?
1. तुम्ही वैयक्तिक वापरासाठी इलेक्ट्रिक कर लोन घेऊ शकता.
2. नवीन इलेक्ट्रिक 4-व्हीलरची खरेदी.
3. नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलरची खरेदी.
4. ही योजना देशभरात लागू होईल.
लोन साठीची पात्रता
1. भारताचे स्थायी निवासी किंवा अनिवासी भारतीय (NRI) कर्ज घेऊ शकतात.
2. किमान वय 18 वर्षे आणि कमाल 75 वर्षे
3. वयाच्या 60 वर्षांनंतरही ज्यांच्या उत्पन्नाचा नियमित स्रोत आहे.
4. तुम्ही इतर पात्र व्यक्तींसोबत वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे कर्ज घेऊ शकता. 3 अर्जदारांची कमाल मर्यादा आहे. म्हणजेच, मुख्य अर्जदारासह जास्तीत जास्त 2 सह-अर्जदार असू शकतात.
5. सह-अर्जदारांमध्ये जोडीदार, वडील, आई, मुलगा, अविवाहित मुलगी यांचा समावेश होतो.
टॅक्स वाचवू शकतो
जर तुम्ही इलेक्ट्रिक वाहन खरेदी केले तर तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंतचा टॅक्सही वाचवू शकता. जी लोकं कर्जाद्वारे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करतात ते कलम 80EEB अंतर्गत कर्जासाठी भरलेल्या व्याजावर 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीसाठी पात्र असतील. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार, यासाठी कर्ज 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2023 दरम्यान मंजूर केले जावे. तसेच, केवळ वैयक्तिक करदाते किंवा व्यावसायिकांनाच त्याचा लाभ मिळेल.