25 मार्चपर्यंत स्वस्तात खरेदी करा TVS iQube स्कुटर; नंतर सबसिडी होणार बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या,भारतात विशेषत: शहरी भागात इलेक्ट्रिक स्कूटर ही एक सामान्य गोष्ट आहे. पेट्रोल डिझेलचा खर्च वाचवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करण्याला आपलं प्राधान्य देत आहेत. भारत सरकार सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी खरेदीवर FAME अनुदान देत आहे. परंतु आता FAME II सबसिडी लवकरच संपुष्टात येणार असून त्यानंतर इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती गगनाला भीडतील. अशावेळी सर्वसामान्य लोकांना इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या अधिक कठीण होईल.

परंतु FAME II सबसिडीचा लाभ घेण्याची संधी अजून संपली नाही. तुम्हांला सुद्धा FAME II सबसिडीचा लाभ घेत नवीन इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करायची असेल तर प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी TVS ची TVS iQube ही इलेक्ट्रिक स्कुटर तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकते. या स्कुटर खरेदीमुळे केवळ तुमच्या पैशाची बचत होणार नाही तर तुम्हाला छान असा ड्रायव्हिंग अनुभव मिळेल… तसेच टिकायला सुद्धा ही स्कुटर अतिशय मजबूत असून कनेक्टिव्हिटीसाठी सुध्दा बेस्ट आहे.

भारतीय बाजारपेठेत TVS iQube लोकप्रिय स्कुटर मध्ये गणली जाते. सध्या देशात तिचे एकूण 2.5 लाखांहून अधिक युनिट्स असून हेच या गाडीच्या प्रसिद्धीचे द्योतक आहे . महत्वाची गोष्ट म्हणजे TVS iQube साठी FAME II सबसिडी तब्बल 22,065 रुपये आहे. ही सबसिडी रक्कम इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरी क्षमतेनुसार ठरलेली असते.

त्यामुळे, भारतातील नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीदारांसाठी अशी संधी पुन्हा येणार नाही. न भूतो न भविष्य अशी ही संधी असल्याने वेळीच याचा लाभ घेऊन ग्राहक TVS iQube स्वस्तात खरेदी करू शकतात. त्यासाठी येत्या 25 मार्च 2024 पर्यंत ग्राहकांनी या इलेक्ट्रिक स्कुटरचे बुकिंग करावं आणि कमी पैशात ही स्कुटर घरी घेऊन या…..