“या वर्षाअखेर मानवी मेंदूत बसवता येऊ शकणारी कॉम्प्युटर चीप तयार होणार”-एलन मस्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि स्पेसएक्स, टेस्ला सारख्या कंपन्यांचे मालक एलन मस्क हे आपल्या नवनवीन विचार तंत्रामुळे जगामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांनी यावेळी जगाला आश्चर्यचकित करू शकेल असे विधान केले आहे. ते म्हणतात की, ‘एका वर्षाच्या आतमध्ये अशी कम्प्युटर चिप तयार केले जाईल जी, माणसाच्या मेंदूमध्ये बसवता येऊ शकते. यामुळे कंप्युटर आणि मानवाचा मेंदू एकमेकांशी जोडले जाऊ शकतील. व नवनवीन माहिती मानवी मेंदूच्या विकासासाठी मिळू शकेल.

एलन मस्क यांनी 2016 मध्ये न्युरालींक ही कंपनी सुरू केली होती. ही कंपनी अल्ट्रा हाय बँडविथ ब्रेन – मशीन सध्या तयार करत आहे. नुकत्याच झालेल्या जो रोगण यांच्या एका पॉडकास्टमध्ये एलन मस्क बोलताना म्हणाले की, ‘रोबोट मानवाच्या मेंदूमध्ये चिप बसवण्याचे काम करू शकेल. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने मानवी आयुष्यावर ताबा मिळवू नये म्हणून, कम्प्युटर आणि मानवी मेंदू यांना जोडणे गरजेचे आहे. मेंदूमध्ये लावले जाणारे डिवाइस हे खूप छोटे म्हणजे एक इंच इतक्या आकाराचे असेल. व याचा रिजेक्शनचा धोकाही फार कमी असणार आहे. असे मास्क यांचे मत आहे.

मस्त पुढे सांगतात की मानवाच्या डोक्यातील छोटा तुकडा का काढून इलेक्ट्रोड मानवी मेंदूमध्ये रॉबट च्या साह्याने टाकले जातील आणि छोट्या चित्रांमध्ये कॉम्प्युटरची बसवली जाईल यामुळे डोक्यावर छोटासा काळा डाग दिसेल सध्या मनुष्याच्या केसाच्या दहाव्या भाग आहेत की छोटी रेड तयार करण्यात करण्याचा प्रयत्न सुरू आहे या सर्व प्रयत्नांमुळे मनुष्याच्या ब्रेन इंजुरी ला ट्रीप करण्याचे काम करण्यात येईल सध्या माकडाच्या मेंदूमध्ये अशा प्रकारची चिप बसविण्यात आली असून माकड मेंदूचा वापर करून व्हिडिओ गेम सुद्धा खेळू शकतो अशीही माहिती त्यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.