हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी मालकीची टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL बाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. आता बीएसएनएलचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 1.64 लाख कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन पॅकेजला मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की,” यासोबतच मंत्रिमंडळाने भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड (BBNL) च्या विलीनीकरणाला देखील मंजुरी दिली आहे.
अश्विनी वैष्णव यांनी पुढे सांगितले की,” 4G सर्व्हिसच्या विस्तारात मदत करण्यासाठी सरकार BSNL ला स्पेक्ट्रम वाटप करेल. सार्वजनिक क्षेत्रातील या टेलिकॉम कंपनीची 33,000 कोटी रुपयांची वैधानिक देणी इक्विटीमध्ये रूपांतरित केली जातील. तसेच, कंपनी 33,000 कोटी रुपयांचे बँक कर्ज फेडण्यासाठी बाँड देखील जारी करेल. कंपनीचे नेटवर्क अपग्रेड करण्यासाठी CAPEX ला आज मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे.”
BBNL चे ऑप्टिकल फायबर BSNL चे असेल
केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की,” या पॅकेजमुळे टेलिकॉम कंपनीला 4G वर अपग्रेड करण्यात मदत मिळेल. त्याच वेळी, BSNL आणि BBNL च्या विलीनीकरणामुळे संयुक्त कंपनी देखील मजबूत होईल. या विलीनीकरणामुळे, बीएसएनएल कडे आता देशभरात पसरलेल्या BBNL च्या 5.67 लाख किमी ऑप्टिकल फायबरचे संपूर्ण नियंत्रण असेल.”
विलीनीकरणामुळे होणार मोठा फायदा
बीएसएनएल चे 6.80 लाख किमी पेक्षा जास्त ऑप्टिकल फायबर नेटवर्क आहे. त्याच वेळी, BBNL ने देशातील 1.85 लाख ग्रामपंचायतींमध्ये 5.67 लाख किमी ऑप्टिकल फायबर टाकले आहेत. युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (USOF) द्वारे BBNL ने घातलेल्या फायबरचे कंट्रोल BSNL ला मिळेल. यामध्ये निधी उभारण्यासाठी सरकार पुढील तीन वर्षांत बीएसएनएलसाठी 23,000 कोटी रुपयांचे बॉण्ड्स जारी करेल. त्याच वेळी, सरकार MTNL साठी 2 वर्षांत 17,500 कोटी रुपयांचे बॉण्ड्स जारी करेल.
BSNL कडे 4G सर्व्हिस नाही
आता भारतात 5G स्पेक्ट्रमसाठीचा लिलाव होत आहे. या लिलावात रिलायन्स जिओ, एअरटेल आणि इतर कंपन्या सहभागी होत आहेत. मात्र, बीएसएनएल या लिलावात सहभागी झालेली नाही. कारण त्यांनी अजूनही 4G सर्व्हिस जारी केलेली नाही. बीएसएनएल सध्या फक्त 4G सर्व्हिस सुरू करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. यासाठी बीएसएनएलला सोशल मीडियावर यूझर्स ट्रोल देखील करत आहेत.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bsnl.co.in/
हे पण वाचा :
Multibagger Stock : ‘या’ केमिकल कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 40% रिटर्न !!!
Bank Holiday : ऑगस्टमध्ये बँका 17 दिवस राहणार बंद, बँकेच्या सुट्ट्यांची लिस्ट तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण !!! नवीन भाव तपासा