हिंगोली | राज्यात पोलीस दलात अपुरे मनुष्य बळ लक्षात घेता १२५०० जागा भरणास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून प्रत्येक जिल्ह्यातुन रिक्त जागा व रोष्टर नुसार भरतीबाबत माहिती घेतली जात आहे. पुढील काही दिवसातच लवकर भरती प्रकिया सुरू केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी रविवारी ता.१८ राजी पत्रकार परिषदेत दिली आहे.
हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहातआयोजित पत्रकार परिषदेत मंत्री देसाई यांच्यासह शिवसेना संपर्क प्रमुख आनंदराव जाधव महिला विकास आर्थिक महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे,खासदार हेमंत पाटील,आमदार संतोष बांगर,वसमत तालुका प्रमुख राजु चापके, राम कदम, दिलीप बांगर, सुनील काळे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना देसाई म्हणाले की राज्यात अपुरे मनुष्यबळामुळे पोलिसांवर कामाचा ताण येत आहे.त्यामुळे लवकरच ही भरती केली जाणार आहे.त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातुन रिक्त जागा रोष्टरनुसार जागा,राखीव जागा यांची माहिती घेतली जात आहे.या माहितीची संकलन झाल्यानंतर तातडीने प्रत्येक्षात भरती प्रक्रिया सुरू केली जाईल.
राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी तसेच नवीन पोलीस ठाण्याच्या इमारतीचा प्रश्नच आहे. मात्र मागील वर्षी कोविड मुळे राज्यातीच्या तिजोरीत १ लाख २५ हजार कोटी रुपयाची उत्त्पन्न कमी आले आहे.तर उपलब्ध निधी कर्मचारी व कोविड पूर्ण खर्च झाला आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती रुळावर आल्यानंतर सर्व प्रश्न सोडविले जातील.
पोलिसांच्या निवासस्थाना बाबत शासन संवेदनशील असून पोलीस गृहनिर्माण साठी मागील वर्षी ३५० कोटी रुपये राखीव ठेवले होते या वर्षी ही रक्कम ८०० कोटी करण्यात आली आहे. पुढील काळात निवासस्थानाचा प्रश्नही सुटणार आहे. शिव संपर्क अभियानाच्या माध्यमातून जनतेला सरकारने केलेल्या कामाची माहिती दिली जात असून जनतेच्या अपेक्षा जाणून घेतल्या जात आहे. यांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.