नवी दिल्ली । केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमती (MSP) वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी याला मंजुरी दिली. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही माहिती दिली.
तोमर म्हणाले की,”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 7 वर्षात कृषीक्षेत्रात बरीच कामे केली गेली, ज्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला.”
Cabinet has approved MSP for kharif crops for marketing season 2021-22. Highest absolute increase in MSP over the previous year has been recommended for sesamum (Rs 452 per quintal) followed by tur & urad (Rs 300 per quintal each): Govt of India
— ANI (@ANI) June 9, 2021
पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की,”खरीप हंगामाच्या अगोदरच MSP जाहीर केली गेली आहे आणि त्यातही वाढ करण्यात आली आहे. रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी, रेल्वेला अधिक 4 जी स्पेक्ट्रमचे वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत रेल्वे G स्पेक्ट्रम वापरत असे.”
खरीफ सीजन के पहले ही MSP घोषित की है और उसे बढ़ाया भी गया है। रेलवे यातायात ज्यादा सुरक्षित करने के लिए 4G स्पेक्ट्रम का रेलवे को ज्यादा आवंटन किया गया है। अब तक रेलवे 2G स्पेक्ट्रम का उपयोग करती थी: केंद्रीय मंत्री प्रकाश जावड़ेकर pic.twitter.com/jD3gqLCitE
— ANI_HindiNews (@AHindinews) June 9, 2021
जावडेकर म्हणाले की,”रेल्वेमध्ये आता ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शनची व्यवस्था बरीच मजबूत केली जात आहे. दोन भारतीय वाहनांची टक्कर होऊ नये म्हणून 4 भारतीय कंपन्यांनी अशी व्यवस्था केली आहे.”
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा