हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या जन आशीर्वाद यात्रेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर प्रहार करणारे भाजपनेते तथा कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी आज पुन्हा आपल्या स्थगित केलेल्या जन आशीर्वाद यात्रेला रत्नागिरीतून सुरुवात केली. “मी देशाचा कॅबिनेट मंत्री असलो तर पहिल्यांदा कोकणचा रहिवाशी आहे. इथूनच मी पुढे गेलो आहे. त्यामुळे येथील विकास साधण्यासाठी मी प्रयत्न करेन. आणि येथील बागायतदार, शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ देणार नाही”, असे आश्वासन मंत्री राणे यांनी दिले.
कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी आपल्या तीन दिवसांच्या जन आशीर्वाद यात्रेला रत्नागिरीतून सुरुवात केली यावेळी त्यांचे ग्रामस्थ, कार्यकर्त्यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनीबागायतदारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी देशातील एक कॅबिनेटमंत्री असलो तर शेवटी मी कोकणातून गेलो आहे. माझ्या मंत्रिपदाचा उपयोग हा कोकणाला मिळावा म्हणून मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला मंत्रिपद दिले आहे. यामध्ये फूड प्रोसिसिंग विभाग आहे. मी एका महिन्यात अधिकार्याना घेऊन येईल व येथील शेतकऱयांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन.
मी पंतप्रधान व मला आशीर्वाद द्यावेत. म्हणून मी या ठिकाणी आलोय. मी जे आपल्यासमोर बोललोय. त्याचा विश्वास नक्कीच मी पूर्ण करेन. मी येथील आंबा, काजू बागायतदारांचे निवेदन स्वीकारले आहे. त्या निवेदनाची माहिती घेत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तसेच येथील एकाही शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ देणार नाही.