कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाईचे रविवारी मतदार संघात जल्लोषी स्वागत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पाटण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने मतदार संघात मोठ्या जल्लोषाची तयारी सुरू आहे. रविवारी दि. 14 आॅगस्ट रोजी पाटण मतदार संघात ठिकठिकाणी आ. शंभूराज देसाई यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जोरदार नियोजन सुरू केले आहे.

कराड तालुक्यातील सुपने-विजयनगर येथून रविवारी सकाळी 10 वाजता बाईक रॅली सुरू होणार आहे. या बाईक रॅलीत देसाई गटाचे शेकडो बाईकस्वार जमविण्याची तयारी सुरू आहे. सुपने ते मरळी कारखाना या दरम्यान प्रत्येक गावात आ. देसाई यांचे स्वागत करण्यात येणार आहे. कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यादाच मंत्री शंभूराज देसाई  येत असल्याने कार्यकर्त्याच्यात उत्साह आहे. तालुक्यात स्वागताचे बॅंनर्स तयार करण्याच्याही हालचाली सुरू झालेल्या आहेत. तर अनेकांनी साऊंड सिस्टिमसही स्वागतासाठी सज्ज केल्या आहेत.

विजयनगर- सुपने येथे जल्लोषी स्वागत केल्यानंतर तांबवे फाटा, विहे, मल्हारपेठ, नवारस्ता येथे कार्यकर्त्यांकडून स्वागत होईल. तेथून पुढे मरळी कारखाना येथे दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास जाहीर सभा होणार आहे. सभेनंतर मरळी येथील ग्रामदैवत निनाई देवीचे दर्शन घेण्यासाठी कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई जातील.

बंडखोरीनंतर पहिलीच जाहीर रविवारी सभा : – शिवसनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची मल्हारपेठ येथे जाहीर सभा झाली. तसेच बंडखोरी केल्यानंतर प्रथमच आ. शंभूराज देसाई जाहीर सभेत बोलणार आहेत. त्यामुळे आता कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर मंत्री देसाई काय बोलणार याकडे पाटण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.