चर्चा तर होणारच !! रोहित पवारांकडून फडणवीसांचे कौतुक; म्हणाले, त्यांची कार्यशैली अजितदादांसारखीच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील पदभरतीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली . यावेळी त्यांनी फडणवीस यांची तुलना थेट अजित पवारांशी केल्याने पून्हा एकदा राजकीय चर्चाना उधाण आलं आहे. फडणवीसांची कार्यशैली अजितदादांसारखीच भारावणारी असल्याच मत रोहित पवारांनी व्यक्त केलं.

रोहित पवारांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून फडणवीसांच्या भेटीचे फोटो शेअर केले. MPSC च्या कक्षेबाहेरीलही सर्व जागा दुय्यम सेवा मंडळामार्फत न भरता #MPSC मार्फतच भराव्यात यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र दिलं. फडणवीस साहेबांशी वैचारिक मतभेद असले तरी त्यांची कार्यशैली अजितदादांसारखीच भारावणारी असल्याची बाब त्यांच्याशी चर्चा करताना ठळकपणे जाणवते अशा शब्दात रोहित पवारांनी फडणवीस यांचे कौतुक केलं.

फडणवीसांची भेट नेमकी कशासाठी-

सध्या राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील जागा दुय्यम सेवा मंडळामार्फत न भरता एमपीएससी मार्फतच भराव्यात अशी मागणी करत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना लेखी पत्र लिहिले. राज्यशासन दुय्यम सेवा मंडळांच्या माध्यमातून पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठी प्रयत्नशील असून त्याबाबत प्रस्ताव मागविण्यात आल्याच्या बातम्या अनेक माध्यमातून प्रसिद्ध झाल्या आहेत. भरती प्रक्रियेतील अपारदर्शकता आणि अनियमितता यासारख्या कारणांमुळे दुय्यम सेवा मंडळे बरखास्त करण्यात आली होती. दुय्यम सेवा मंडळे, जिल्हा निवड समिती महापोर्टल यासारख्या माध्यमातून होणान्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अपारदर्शकता आणि भ्रष्टाचार होत असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. परिणामी भरती प्रक्रियेबाबत विश्वसनीयता राहत नाही. राज्यसेवा आयोग है विश्वसनीयता आणि पारदर्शकता असलेले एकमेव माध्यम आहे. असं मत रोहित पवार यांनी मांडलं. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सेवा आयोगावर ताण असला तरी आयोगाला ताकद दिल्यास सर्व भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबवता येऊ शकते, असा विश्वास रोहित पवार यांनी पत्राद्वारे व्यक्त केला आहे.