कॅगकडून मोदी सरकारचे 7 मोठे घोटाळे उघडकीस; विरोधकांचा हल्लाबोल

modi sad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कॅग म्हणजेच नियंत्रक आणि महालेखा परीक्षणने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात मोदी सरकारचे 7 मोठे घोटाळे उघडकीस आले आहेत. त्यामुळे मोदी सरकारचा सर्व काळा कारभार समोर आला आहे. मोदी सरकारकडून झालेले हे 7 घोटाळे किरकोळ नसून कोटींच्या घरातील आहेत. याचा परिणाम आर्थिक तिजोरीवर देखील झाला आहे. कॅगने प्रसिद्ध केलेल्या अहवालात, द्वारका एक्सप्रेस, आयुष्मान भारत, अयोध्या विकास, ग्रामीण विकास, विमान घोटाळा अशा अनेक क्षेत्रात झालेल्या घोटाळ्यांची माहिती दिली आहे.

केंद्र सरकारकडून द्वारका एक्सप्रेस वेच्या मार्गासाठी 18 कोटी 20 लाख रुपये प्रति किमी. इतका निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, या प्रकल्पासाठी निधीपेक्षा जास्त म्हणजेच 250 कोटी रुपये खर्च झाल्याचे कॅगने आपल्या अहवालात म्हटले आहे. तसेच, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 7.5 लाख लाभार्थी एकाच क्रमांकाशी जोडण्यात आल्याचे देखील उघडकीस आले आहे. आयुष्मान भारत योजनेत तर, काही मृत घोषित करण्यात आलेल्या व्यक्तीच्या नावे देखील योजनेची रक्कम रुग्णालयाला देण्यात आल्याचे समोर आले आहे.

त्याचबरोबर, अयोध्या विकास प्रकल्पासाठी देखील केंद्र सरकारने एक मोठी रक्कम मंजूर केली होती. मात्र त्यामध्ये देखील कंत्राटदारांना अवाजवी फायदा झाल्याचे कॅगने म्हणले आहे. प्रकल्पासाठी घोषित करण्यात आलेल्या रकमेचा फायदा जास्त प्रमाणात कंत्राटदारांना झाला आहे. इतकेच नव्हे तर, ग्रामीण विकास मंत्रालयाने पेन्शन योजनेसाठी जो निधी मंजुर केला होता त्याचा वापर देखील मोदी सरकारच्या प्रचारासाठी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

एवढे करून देखील न थांबता, कॅगने HAL वर विमान इंजिनच्या डिझाईन-उत्पादनात गंभीर त्रुटी असल्याचा आरोप मोदी सरकारवर लावला आहे. यामध्ये तर 154 कोटींचे नुकसान झाल्याचे कॅगने आपल्या अहवालात सांगितले आहे. मोदी सरकारने केलेल्या या घोटाळ्याचा तोटा आर्थिक तिजोरीला झाला आहे. दरम्यान , कॅगने मोदी सरकारचा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर राजकिय वर्तुळात खळबळ माजली आहे. तर विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे आता यावर मोदी सरकार विरोधकांना काय उत्तरे देईल याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.