सर्वच प्रादेशिक पक्षांची मोट बांधून शरद पवार देशात चमत्कार घडवतील का ?? पहा हा स्पेशल रिपोर्ट

Sharad Pawar Pm
Sharad Pawar Pm
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शरद पवार… महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील एक मोठं नाव..राजकीय परिस्थिती कशीही असली तरी पवारांच्या लढवय्या वृत्तीने अनेकदा हरलेली बाजी देखील पलटवलीय…देशातील सर्व पक्षांशी आणि नेत्यांशी चांगले संबध असलेला देशातील एकमेव नेता म्हणजे शरद पवार. ममता,मायावती ते लालू नितीश,अखिलेश.. या सर्व नेत्यांशी त्यांचा असलेला संपर्क हीच त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू ठरू शकते. म्हणूनच तर पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांची मोट बांधली जावी, अशी अपेक्षाच काँग्रेसने व्यक्त केली आहे. त्यामुळे उद्या काँग्रेससह तिसऱ्या आघाडीने पवारांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलंच तर सर्वच प्रादेशिक पक्षांची मोट बांधून शरद पवार देशात चमत्कार घडवतील का ?? चला पाहुयात…

शरद पवारांचे देशातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात ज्या पद्धतीने कट्टर हिंदुत्ववादी पक्ष असलेल्या शिवसेनेला भाजपपासून दूर करून संयुक्त पुरोगामी आघाडीत घेतले, तसाच चमत्कार ते देशपातळीवरही घडवून आणू शकतात, असा विश्वास वाटू लागल्यानेच त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्याची खेळी आता राष्ट्रीय स्तरावर होताना दिसत आहे.

ममता-मायावती-अखिलेशशी चांगले संबंध-

आज बसपाच्या अध्यक्षा मायावती, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, तिकडे आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू बिहार मध्ये नितीशकुमार हे काँग्रेससोबत जायला तयार नाहीत. शिवाय डावेही काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारण्यास तयार नाहीत. अशावेळी या सर्व पक्षांना पवारच एकत्र आणू शकतात. या सर्व पक्षांच्या नेत्यांशी पवारांचे चांगले संबंध आहेत.

देशातील सर्व प्रश्नांची जाण असलेला नेता –

शरद पवार यांचा राजकारणातील अनुभव मोठा असून अनेक प्रश्नांची जाण देखील आहे. सध्या तरी त्यांच्या सारखा अभ्यासू आणि या वयातही तरुणांना लाजवेल अस काम करणारा नेता देशात नाही. त्यामुळे पवार पंतप्रधान होणार असतील तर लालू ,नितीश, अखिलेश, मायावती, चंद्राबाबू हे सर्व प्रादेशिक नेते पवारांना पंतप्रधान करून त्यांच्या नेतृत्वाखाली संपुआ सरकार मध्ये काम करू शकतात.

राहुल गांधी सोडून शरद पवारच का ??

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष असताना सलग दोन्ही लोकसभा निवडणुकीत मतदारांनी त्यांना नाकारलं. तसेच काँग्रेस पक्षातीलच जेष्ठ नेत्यांचा त्यांना विरोध आहे. तसेच विरोधी पक्षात मायावती, ममता बॅनर्जी, मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, सीताराम येचुरी, शरद यादव आदी नेत्यांना म्हणावा तसा जनाधार राहिलेला नाही अशावेळी शरद पवार एक जेष्ठ आणि अनुभव असलेला नेता या नात्याने काँग्रेसला तारू शकतात. शरद पवार हे लोकनेते आहेत. पवारांना संपूर्ण देश ओळखतो. अभ्यासू, जाणता नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. शिवाय देशपातळीवर सर्व पक्षांची मोट बांधू शकेल असे पवार हे एकमेव नेते आहेत.

महाराष्ट्रात केली महाविकास आघाडीची स्थापना

महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप वरचढ ठरत असतानाच शरद पवारांनी अचूक टायमिंग साधत कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या शिवसेनेलाच भाजप पासून वेगळे केले आणि शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडीची स्थापना करून भाजपला आणि प्रामुख्याने मोदी -शहाना हादरा दिला. त्यामुळे पवार मनात आलं तर काहीही करू शकतात असा संदेश संपूर्ण देशात गेला.

फक्त आता प्रश्न आहे विश्वासाचा

शरद पवार हे कितीही पावरफुल असले तरी ते संधीसाधू आहेत, ते बोलतात एक आणि करतात भलतेच अस नेहमी म्हणल जात. त्यामुळे त्यांच्या विश्वासहार्यतेचीही राजकारणात चर्चा होत असते. पण असं असलं तरी पवारांना वगळून देशाचं राजकारण करणे कोणालाही शक्य नाही. पवारांचं महत्त्व, अभ्यास, प्रश्नांची जाण, त्यावरील असलेली अचूक तोड म्हणजे शरद पवार… त्यामुळे पवार आपल्या सोबतच राहायला हवे अस सर्वच राजकीय पक्षांना वाटते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’