हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँक ऑफ इंडियानंतर आता Canara Bank कडूनही स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट्स सुरू केली गेली आहे. मात्र हे लक्षात घ्या कि, ही योजना 2 कोटींपेक्षा कमी डिपॉझिट्ससाठी आहे. ही FD योजना 30 सप्टेंबर 2022 पर्यंत व्हॅलिड असेल. या FD मध्ये बँकेकडून 5.10 टक्के रिटर्न दिला जात आहे. त्याच वेळी, बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.50 टक्के रिटर्न मिळत आहे. एक निवेदन जारी करत कॅनरा बँकेकडून यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे.
Canara Bank च्या या FD चा कालावधी 333 दिवसांचा असेल. यामध्ये सामान्य नागरिकांना 5.10 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 5.60 टक्के रिटर्न दिला जाईल. यामध्ये 30 सप्टेंबर 2022 पर्यंत गुंतवणूक करता येईल. हे जाणून घ्या की या FD चे नियम इतर कालावधीच्या FD सारखेच आहेत. मात्र यामधील फरक हा आहे की हा नवीन कालावधी आहे आणि यामध्ये गुंतवणुकीची संधी मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे.
Canara Bank च्या सामान्य एफडीवरील व्याजदर
12 मे 2022 रोजी बँकेने आपल्या एफडीच्या व्याजात शेवटची वाढ केली होती. 5 ते 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर बँकेकडून 5.75 टक्के व्याज मिळत आहे. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.50 टक्के व्याज देखील दिले जात आहे. मात्र FD मुदतीपूर्वी बंद केल्यास डिपॉझिट्सवरील व्याजदर निश्चित व्याजदरापेक्षा 1% कमी असतो.
बँक ऑफ इंडिया स्पेशल एफडी
बँक ऑफ इंडियाने देखील गुरुवारी 444 दिवसांची स्पेशल टर्म एफडी एफडी सुरू केली. यामध्ये गुंतवणूकदारांना 5.50 टक्के रिटर्न मिळत आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के जास्त म्हणजेच 6.00 टक्के रिटर्न मिळत आहे. 7 सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या बँकेच्या 117 व्या स्थापना दिनानिमित्त ही योजना लागू केल्याचे बँकेने म्हटले आहे. तसेच बँकेच्या सर्व शाखांमध्ये आणि ऑनलाइन देखील उपलब्ध असेल. Canara Bank
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://canarabank.com/User_page.aspx?menulevel=1&menuid=3&CatID=47
हे पण वाचा :
PAN-Aadhar Linking साठी आता फक्त 6 दिवसच बाकी, अशा प्रकारे पूर्ण करा प्रक्रिया
PM Kisan च्या e-KYC ची शेवटची तारीख पुन्हा वाढवण्यात आली, अशा प्रकारे पूर्ण करा प्रक्रिया
PNB ग्राहकांना आता चेक पेमेंटच्या एक दिवस आधी बँकेला द्यावी लागणार माहिती !!!