Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Canara Bank : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर आता जवळपास सर्वच बँकाकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. अशातच आता Canara Bank कडून ग्राहकांसाठी 666 दिवसांसाठी स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट्स (FD) योजना लाँच करण्यात आली आहे. हे लक्षात घ्या कि, खाजगी क्षेत्रातील या बँकेकडून सामान्य नागरिकांना 7% व्याजदर दिले जाते. मात्र या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 7.5% व्याज दर मिळेल. तसेच ही योजना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठीच उपलब्ध असेल.

Canara Bank raises Rs 2,000 crore by issuing Basel III compliant bonds

Canara Bank कडून ट्विटरद्वारे याबाबत माहिती देताना सांगण्यात आले की, ही स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट्स योजना कमीत कमी 666 दिवसांसाठी सुरू करता येईल. तसेच योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना 7% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.5% वार्षिक व्याजदर मिळेल.

RBI FD Rules 2022: Fixed deposit investors ALERT! New FD rule on interest rate to impact your investment - details | Zee Business

बँकेच्या कर्जावरील व्याज दरात वाढ

Canara Bank ने नुकतेच आपल्या रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) आणि फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) च्या मार्जिनल कॉस्टमध्ये वाढ केली आहे. 7 ऑक्टोबर 2022 पासून हे नवीन दर लागू झाले आहेत, असे बँकेकडून सांगण्यात आले आहे. हे लक्षात घ्या कि, बँकेने आपल्या सर्व मुदतीसाठीच्या MCLR आणि RLLR मध्ये वाढ केली आहे. Canara Bank ने ओव्हरनाईट ते 1 महिन्याच्या MCLR वरील दर 15 बेसिस पॉईंट्सने वाढवून 7.05% केला ​​आहे. तसेच तीन महिन्यांच्या MCLR वरील दर 15 बेसिस पॉईंट्सने 7.40% तर सहा महिन्यांच्या MCLR वरील दर 15 बेसिस पॉईंट्सने वाढवून 7.80% आणि एका वर्षाच्या MCLR वरील दर 1 बेसिस पॉईंट्सने वाढवून 7.90% केला आहे.

Unity Bank Offers Up To 8.4% Interest Rate On Fixed Deposit Under 'Shagun 501'

युनिटी बँकेनेही लाँच केली दिवाळी स्पेशल ऑफर

दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडकडूनही शगुन 501 फिक्स्ड डिपॉजिट स्कीम लॉन्च करण्यात आली आहे. ज्या अंतर्गत ग्राहकांना 501-दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्ससाठी 7.90% आकर्षक व्याजदर दिला जाईल. तसेच, या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना 8.40% वार्षिक व्याज दिले जाईल. मात्र ही ऑफर फक्त 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत बुक केलेल्या डिपॉझिट्ससाठी उपलब्ध असेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://canarabank.com/User_page.aspx?othlink=9

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
गेल्या 15 वर्षांत ‘या’ Multibagger Stock ने दिला 19,900% रिटर्न
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर
फक्त उद्यापर्यंतच घेता येऊ शकेल ICICI Bank च्या ‘या’ योजनेचा लाभ !!!