हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजकाल भारतामध्ये कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने या आजारामुळे लोकांचे बळी जात आहेत. अशातच अपोलो हॉस्पिटलने एक अभ्यास केला आणि अभ्यासात एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे. त्यांनी अहवाला म्हटले आहे की, भारतामध्ये लवकरच कर्करोगाचे (Cancer Risk) प्रमाण वाढू शकणार आहे. त्याचप्रमाणे हेल्थ ऑफ द नेशन या नावाने प्रसिद्ध झालेला अहवालात त्यांनी म्हटले आहे की, देशातील तरुणांना कर्करोगाचा धोका आहे.
रिपोर्टमध्ये काय समोर आले | Cancer Risk
रिपोर्टनुसार आपल्या देशातील अनेक तरुण हे आता कॅन्सरला (Cancer Risk) बळी पडत आहे. आणि ही अत्यंत चिंतादायक बाब आहे. 2020 मधील आकडेवारी पाहिली तर देशामध्ये 13.9 लाख कर्करोगाचे रुग्ण होते. 2025 पर्यंत ही संख्या 15.7 लाखापर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. म्हणजेच गेल्या 5 वर्षात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये 13 टक्क्यांनी वाढ झालेली आहे आणि यातील जास्तीत जास्त रुग्ण हे तरुण आहेत.
तरुण वयात कर्करोगाचा धोका जास्त
अहवालात आलेल्या माहितीनुसार भारतातील महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग आणि पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग अधिक वेगाने वाढत आहे. कर्करोगामध्ये तरुण रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. इतर देशाच्या तुलनेत भारतामध्ये कर्करोगाचे सर्वाधिक जास्त बळी जात आहे. याचे मोठे कारण म्हणजे भारत हा इतर देशांच्या तुलनेत त्यांच्या आजारांची तपासणी फार कमी वेळा करतात. आणि जर केली तर ती खूप उशिरा करतात. यावेळी जास्त काही उपचार करता येत नाही. त्यामुळे आजकाल तरुणांमध्ये कर्करोगाचे प्रमाण जास्त वाढत चालले आहे.
भारतामध्ये कोणत्या प्रकारचे कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे?
- अहवालानुसार महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग या कर्करोगांचे प्रमाण वाढत चाललेले आहे
- पुरुषांमध्ये तोंडाचा कर्करोग आणि प्रोटेस्ट कर्करोगाचे प्रमाण जास्त दिवस वाढत चाललेले आहे.
- त्याचप्रमाणे तरुणांमध्ये कोलन कॅन्सर आणि आतड्याचा कॅन्सर या कॅन्सरचे प्रमाण वाढत चाललेले आहे कर्करोगाच्या रुग्णांपैकी 30 टक्के रुग्ण हे 50 वर्षापेक्षा देखील कमी वयाचे आहे. त्याचप्रमाणे येत्या दहा वर्षात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याची भीती देखील या अहवालात नोंदवण्यात आलेली आहे.