पुणे प्रतिनिधी । अमित येवले
हिंजवडीमध्ये अमानुष कृरतेचा कळस करत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. संत तुकाराम महाराज सहकारी कारखाना कासारसाई, ता. मुळशी येथे दोन उसतोड कामगार यांच्या १२ वर्षीय मुलींवर अत्याचार झाल्याने त्यात एकिचा मृत्यू झाला होता, तर एक जण मृत्युशी झुंज देत आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली असून घटनेचा निषेध म्हणून आज पुणे येथे भिडे पूल ते शनिवार वाडा असे कैंडल मार्च मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. नागरीकांनी याला उत्स्फुर्त प्रतिसाद देत ‘अत्याचारग्रस्त ऊसतोड कामगारांच्या मुलींना न्याय मिळेल काय?’ असा सवाल केला आहे.
मोर्चाच्या प्रमुख मागण्या –
१) कासारसाई खटला फास्ट ट्रॅक कार्टात चालवून नराधमांना सहा महिण्याच्या आत फाशीची शिक्षा देण्यात यावी.
२) अत्याचारग्रस्त मुलीच्या शिक्षणाची व ऊसतोड कुटुंबियांची पुनर्वसनाची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घ्यावी.
३) कासारसाई खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकिल म्हणुन उज्वल निकम यांची नेमणूक करावी.
४) अत्याचारग्रसचत ऊसतोड कुटुंबाला तात्काळ सरकारने अार्थिल सहाय्य द्यावे.
५) ऊसतोड मजुरांच्या सुरक्षिततेकडे आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासनाने विशेष लक्ष द्यावे.