गोंदिया | cannabis seized : गोंदियामध्ये आरपीएफ पोलिसांनी मोठी कारवाई करत चालत्या ट्रेनमधून 5.540 किलो गांजा जप्त (cannabis seized) केला आहे. गोंदिया आरपीएफ पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन नार्कोस अंतर्गत गाडी क्रमांक 22974 पुरी-गांधी एक्सप्रेसच्या कोच क्रमांक डी 2 मध्ये तपासणी केली असता एका बेवारस बॅगमध्ये तब्बल 5.540 किलो गांजा आढळून आला. यानंतर पोलिसांनी डी 2 मध्ये अधिक तपासणी करत प्रवाश्यांना बॅगबद्दल विचारपुस केली. मात्र, पोलिस चेकींग करत असल्याचे आरोपीला समजल्याने त्याने बॅग गाडीमध्येच ठेवून पळ काढला.
पुरी-गांधी एक्सप्रेसच्या कोच क्रमांक डी 2 गांजा आढळला
गाडी क्रमांक 22974 पुरी-गांधी एक्सप्रेसच्या कोच क्रमांक डी 2 मध्ये गांजा आढळल्याने मोठी खळबळ उडाली. तपासादरम्यान 1 राखडी रंगाची बॅग बेवारस अवस्थेत आढळून आली. या बॅगची तपासणी करण्यात आली तेंव्हा यामध्ये गांजा आढळून (cannabis seized) आला. यानंतर पोलिसांनी गाडीतील इतरही प्रवाशांच्या बॅगा चेक केल्या. ही बॅग नेमकी कोणाची ? गाडीत नेमकी कशी आणि कोणी आणली ? याचा तपास पोलीस करत आहेत.
आरपीएफ पोलिसांनी मोठी कारवाई
आरपीएफ पोलिसांनी पुरी-गांधी एक्सप्रेसमध्ये 5.540 किलो गांजा जप्त केला आहे. यानंतर आरपीएफ पोलिसांनी हा गांजा जप्त (cannabis seized) करत गोंदिया रेल्वे पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. यानुसार अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 8 (C), 20 (B) (ii) NDPS अंतर्गत गुन्हा क्रमांक 0061/2022 दाखल करण्यात आला.
हे पण वाचा :
Instagram वरील प्रेमात 5 लाखाच्या खंडणीची मागणी : युवतीला अटक
कोणत्या बँकाकडून कमी व्याजावर Home Loan मिळेल ते पहा
तान्हुल्या बाळासह माथेफिरूशी लढणाऱ्या “हिरकणी”चा खा. उदयनराजेंनी केला सत्कार
ITC Share : बाजारातील चढ-उतारातही ITC चे शेअर्स गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर !!!
Business Idea : फुलांच्या लागवडीद्वारे अशा प्रकारे कमवा हजारो रुपये !!!