सातारा प्रतिनिधी । साताऱ्यातील सज्जनगड येथे गुरुवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास साताऱ्याहून सज्जनगडकडे निघालेल्या तवेराचा सज्जनगडचा घाट चढत असताना तीव्र वळणावर अपघात झाला. या अपघातात तवेरा गाडीचे नियंत्रण सुटून गाडी 800 फूट खोल दरीत गेली. यामध्ये अजित शिंगरे राहणार सज्जनगड यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.
रात्री उशिरा या अपघाताचा आवाज स्थानिक नागरिकांना आल्यानंतर नागरिकांनी दरीच्या दिशेने धाव घेतली असता संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे निदर्शनास आले. यामुळे सातारा शहर आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान सातारा तालुका पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी येऊन संबंधित व्यक्तीचा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने आज सकाळी बाहेर काढण्यात यश आले असून हा मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय दाखल केला आहे. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे