Car Compare : Maruti Jimny vs Force Gurkha? कोणती गाडी Best? पहा संपूर्ण तुलना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या ऑटो एक्सपो 2023 मध्ये (Car Compare) प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी मारुतीने आपली 5-डोर SUV जिमनी सादर केली. कंपनीने या गाडीचे बुकिंग सुद्धा सुरु केलं असून यामुळे ऑफ रोडिंग साठी शौकीन असलेल्या लोकांसाठी गाडी खरेदी करण्यासाठी एक ऑप्शन मिळाला आहे. ही कार बाजारात महिंद्रा थार आणि फोर्स गुरखा या गाडयांना थेट टक्कर देणार आहे. तुम्हालाही जर ऑफ-रोडिंगची आवड असेल आणि मारुतीची जिमनी घेऊ की फोर्स गुरखा घेऊ असा प्रश्न तुमच्यासमोर पडला असेल तर चिंता करू नका. आज आम्ही या दोन्ही गाड्यांची तुलना आपल्यासमोर करणार आहोत. त्यामुळे दोन्ही गाड्यांची वैशिष्ट्ये पाहून तुम्हीच ठरवा कि तुमच्यासाठी यापैकी कोणती गाडी योग्य आहे.

आकारमान –

गाड्यांच्या आकारमानची तुलना (Car Compare) करायची झाल्यास, मारुती सुझुकीच्या जिमनीची लांबी 3,985 मिमी, रुंदी 1,645 मिमी आणि उंची 1,720 मिमी आहे. या गाडीला 2,590 मिमी व्हीलबेस आणि 210 मिमीचा ग्राउंड क्लीयरन्स मिळतो. तर दुसरीकडे फोर्स गुरखाची लांबी 4,116 मिमी, रुंदी 1,812 मिमी आणि उंची 2,075 मिमी आहे. या गाडीला 2,400 मिमी व्हीलबेस आणि 205 मिमीचा ग्राउंड क्लीयरन्स मिळतो. याचा अर्थ मारुती सुझुकी जिमनीच्या तुलनेत, फोर्स गुरखा ही आकाराने मोठी आणि बसायला ऐसपैस आहे. मात्र जिमनीला फोर्स गुरखापेक्षा उत्तम ग्राउंड क्लीयरन्स मिळतोय जो ऑफ रोडींग साठी उपयुक्त ठरेल.

अन्य फीचर्स – (Car Compare)

मारुतीच्या जिमनी मध्ये तुम्हाला (Car Compare) हेडलॅम्प वॉशर्स, एलईडी हेडलॅम्प आणि फॉग लॅम्प, स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स, क्रूझ कंट्रोल, पॉवर विंडो, कीलेस एंट्री अँड गो, अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, 6 एअरबॅग आणि बरेच फीचर्स मिळू शकतात. तर दुसरीकडे फोर्स गुरखा सुद्धा वैशिष्ट्यांचा बाबतीत कमी नाही. यामध्ये Android Auto आणि Apple CarPlay सह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिट, रिमोट सेंट्रल लॉकिंग, पॉवर विंडो, पॉवर विंडो आणि बरेच फीचर्स मिळतात.

इंजिनची तुलना-

दोन्ही गाड्यांच्या इंजिनची तुलना करायची (Car Compare) झाल्यास, मारुती सुझुकी जिमनीला 1.5 लीटर पेट्रोल इंजिन मिळते. हे इंजिन 105PS पॉवर आणि 134.2Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये 4-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेली 4×4 ड्राइव्हट्रेन मिळते. तर दुसरीकडे फोर्स गुरखाला २.६ लिटर डिझेल इंजिन मिळते. हे इंजिन ९१पीएस पॉवर आणि २५० एनएम टॉर्क जनरेट करू शकते. यात 4×4 ड्राइव्हट्रेनसह 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे.

किमतीत किती आहे फरक-

मारुती सुझुकीने अजून तरी जिमनीची किंमत जाहीर केलेली नाही. परंतु या गाडीची किंमत अंदाजे 10 ते १३ लाख रुपये असण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे गुरखा ऑफ-रोडरची एक्स-शोरूम किंमत 14.75 लाख रुपये आहे.

हे पण वाचा : 

CNG Maruti Cars : CNG कार घेण्याच्या विचारात आहात? पहा जास्त मायलेज देणाऱ्या या 4 गाड्या

Hatchback Car : 10 लाखाच्या आत खरेदी करा या हॅचबॅक कार

CNG Maruti Cars : CNG कार घेण्याच्या विचारात आहात? पहा जास्त मायलेज देणाऱ्या या 4 गाड्या

Auto Expo 2023 : देशातील पहिली Solar Electric Car! 45 मिनिटांत फुल्ल चार्ज; 250 किमी रेंज