हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रवास करत असताना अचानक मध्येच आपल्या Car चा टायर पंक्चर झाल्याची घटना आपल्यासोबत अनेकदा घडली असेलच. आणि अशा गाडी वेळी जर आपल्याकडे एखादा स्पेअर टायर नसेल तर … ही कल्पना करणेच जरा अवघड आहे. मात्र असे घडू नये यासाठी सध्या बाजारात एक असे उपकरण आले आहे. ज्यामुळे आपल्या कारचा टायर अगदी कमी वेळेत कोणत्याही मदतीशिवाय आपल्या स्वतःलाच दुरुस्त करता येईल. हे जाणून घ्या कि, गेल्या काही वर्षांत लोकांमध्ये हे उपकरण खूपच लोकप्रिय ठरले असून याला मोठी मागणी आहे.
या उपकरणाविषयीची माहिती जाणून घ्या
हे लक्षात घ्या कि, Car मधील पंक्चर रिपेअर किटच्या खाली हे उपकरण ठेवले जाते, जे एखाद्या कॉम्प्रेसर सारखे काम करते. मात्र यामध्ये फरक असा आहे की, कंप्रेसर हे फक्त टायर्समध्ये हवा भरण्यासाठी वापरले जाते तर हे उपकरण हवा भरण्याबरोबरच पंक्चर झालेल्या टायरमध्ये सायलेंट भरण्यासाठी देखील वापरता येते. याच्या मदतीने पंक्चर झालेला टायर अगदी काही क्षणांत दुरुस्त केला जातो.
अशा प्रकारे करेल काम
एअर कंप्रेसर पंप सारखे दिसणारे हे उपकरण यूएसबी केबलच्या साहाय्याने कारशी कनेक्ट करता येते. पॉवर सोर्सशी कनेक्ट झाल्यानंतर त्याची नोझल Car च्या टायरला जोडावी लागते. यानंतर यामध्ये सिलेंट भरून ते सेट करावे लागेल. अशा प्रकारे हे उपकरण पूर्णपणे तयार करून ऑन ठेवावे लागेल. यानंतर ते ऑन करताच, त्यामध्ये भरलेले सिलेंट हे पंक्चर झालेल्या टायरमध्ये जाऊन ते दुरुस्त करते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी अवघे काही मिनिटेच लागतील. एकदा का ते कारच्या टायरमध्ये पूर्णपणे पंप झाले की ते बाहेर काढा. यानंतर आपण Car पुन्हा चालवायला मोकळे व्हाल. याच्या किंमती विषयी बोलायचे झाल्यास, ते 3000 ते 5000 रुपयांपर्यंतच्या किंमतीवर मिळू शकेल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.amazon.in/Automaze-Electric-Emergency-Sealant-AM-1613T/dp/B0BD8ZYXH1/ref=asc_df_B0BD8ZYXH1/?tag=googleshopdes-21&linkCode=df0&hvadid=619396329729&hvpos=&hvnetw=g&hvrand=11712141099290988069&hvpone=&hvptwo=&hvqmt=&hvdev=c&hvdvcmdl=&hvlocint=&hvlocphy=9062117&hvtargid=pla-1965380231687&psc=1
हे पण वाचा :
‘या’ Penny Stock ने गेल्या 1 वर्षातच गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये
Multibagger Stock : अवघ्या 12 हजारांच्या गुंतवणूकीद्वारे गुंतवणूकदारांना मिळाले 1 कोटी रुपये
Business Idea : घरबसल्या ‘हे’ व्यवसाय करून मिळवा हजारो रुपये
Fixed Deposits : खुशखबर !!! ‘या’ NBFC कंपनीकडून FD वर 9.36% पर्यंत व्याज मिळवण्याची संधी
Bank locker कसे मिळवायचे ??? या संबंधित नियमांबाबतची माहिती जाणून घ्या