BSNL Recruitment 2023 : BSNL मध्ये तब्बल 11705 जागांवर मेगा भरती; काय आहे पात्रता?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत संचार निगम लिमिटेडने रिक्त पदांसाठी (BSNL Recruitment 2023) मेगा भरती जाहीर केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून या भरतीअंतर्गत कनिष्ठ दूरसंचार अधिकारी (JTO) पदाच्या तब्बल 11,705 जागा भरल्या जाणार आहेत. लवकरच या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होईल.

संस्था – भारत संचार निगम लिमिटेड (Bharat Sanchar Nigam Limited)

पद संख्या – 11705 पदे

भरले जाणारे पद – कनिष्ठ दूरसंचार अधिकारी (JTO)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया – लवकरच सुरु होईल

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

उमेदवाराकडे  कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून संबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा –
किमान – 20 वर्षे
कमाल – 30 वर्षे
SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट.

निवड प्रक्रिया –

परीक्षा (BSNL Recruitment 2023)
मुलाखत
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

परीक्षा फी –

सामान्य/ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 1000/-
SC/ST उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 500/- (BSNL Recruitment 2023)

महत्वाची सूचना – 

BSNL JTO भरती सूचनेनुसार, 50 टक्के पदे GATE स्कोअरद्वारे (BSNL Recruitment 2023) भरली जातील तर उर्वरित 50 टक्के पदे मर्यादित अंतर्गत स्पर्धा परीक्षा (LICE) थेट भरतीद्वारे भरली जातील.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.bsnl.co.in/