हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Car : पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढत जाणाऱ्या किंमतींमुळे जगभर त्यांच्या इतर पर्यायांची मागणी देखील वाढतच आहे. या पर्यायांमध्ये सध्या CNG, ऑटो LPG, हायब्रिड पॉवरट्रेन आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक पॉवरट्रेन असलेल्या कारचा समावेश आहे. भारतातही पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा चांगला इंधन पर्याय म्हणून CNG कडे पहिले जाते आहे. त्याच बरोबर पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा ते स्वस्त देखील आहे आणि याद्वारे प्रदूषण देखील कमी होते.
तर दुसरीकडे, ग्रीन आणि क्लीन पॉवरट्रेनचा पर्याय म्हणून हायब्रीड पॉवरट्रेन टेक्नोलॉजीचाही प्रचार केला जातो आहे. या हायब्रीड पॉवरट्रेन टेक्नोलॉजीमुळे नेहमीच्या पेट्रोल-डिझेल कार आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक पॉवरट्रेन सिस्टीममधील अंतर कमी होणे अपेक्षित आहे. त्याचवेळी सध्या जगभरातही हायब्रीड कारची मागणी देखील वाढतच आहे. अशातच CNG कार आणि हायब्रीड कारमध्ये नेमका काय फरक आहे आणि यापैकी कोणती कार खरेदी करणे योग्य ठरेल ते जाणून घेऊयात… Car
CNG कारचे फायदे काय आहेत ???
या कारमध्ये CNG किट दिले जाते, जे नेहमीच्या पेट्रोल इंजिनला जोडलेले असते. हे किट असलेली कार सीएनजी आणि पेट्रोल या दोन्हीवर शकते. सीएनजी किट आफ्टरमार्केटमधून इन्स्टॉल केले जाऊ शकते किंवा ते OEM द्वारे प्री-इंस्टॉल देखील केले जाऊ शकते. हे लक्षात घ्या कि, भारतात टाटा मोटर्स, मारुती सुझुकी आणि ह्युंदाई सारख्या कंपन्यांकडून सीएनजी किट असलेल्या अनेक गाड्या विकल्या जातात. या गाड्या साधारणपणे बजेटमध्ये येतात. भारतात उपलब्ध असलेल्या बहुतांश सीएनजी कारची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. Car
CNG कारचे तोटे काय आहेत ???
या कारमध्ये, बूट स्पेसमध्ये वाहनाच्या मागील बाजूस सीएनजीची टाकी बसवली जाते. यामुळे कारचा बूट स्पेस कमी होतो. ज्यामुळे जास्त सामान ठेवायला जागा राहत नाही. याशिवाय, अनेक शहरांमध्ये सीएनजी फिलिंग स्टेशन शोधणे देखील अवघड आहे. कारण त्यांची उपलब्धता सध्या खूपच कमी आहे. यासोबतच आता सीएनजीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. अनेक शहरांमध्ये सीएनजी 100 रुपये किलोच्या वर विकले जाते आहे. Car
हायब्रिड इंजिनचे फायदे काय आहेत ???
हायब्रिड कार अनेक ऊर्जा स्रोतांचा वापर केला जातो. यामध्ये अनेकदा त्यात वीज आणि पेट्रोल-डिझेलचे मिश्रण असते. हायब्रिड कार या इलेक्ट्रिक मोटरसह जोडलेल्या अंतर्गत ज्वलन इंजिनसह येतात. हायब्रिड टेक्नॉलॉजीचे फुल हायब्रिड, माइल्ड हायब्रिड आणि प्लग-इन हायब्रिड असे तीन प्रकार आहेत. या गाड्यांचा सर्वात मोठा फायदा असा कि त्या जास्त मायलेज देतात. याशिवाय यातील काही कार ठराविक अंतरापर्यंत इलेक्ट्रिक मोडमध्ये देखील चालवता येतात. Car
हायब्रिड इंजिनचे तोटे काय आहेत ???
माइल्ड हायब्रिडमध्ये इलेक्ट्रिक मोटर आणि ज्वलन इंजिन असते जे एकत्रितपणे काम करतात. तर प्लग-इन हायब्रिड (PHEV), नावाप्रमाणेच, बॅटरी पूर्णपणे रिचार्ज करण्यासाठी मेनमध्ये प्लग करणे आवश्यक आहे. PHEV पूर्ण इलेक्ट्रिक मोडमध्ये ऑपरेट केले जाऊ शकते. मात्र, या गाड्यांची किंमत खूप जास्त आहे. मात्र जर नीट विचार केला तर सध्याच्या काळात हायब्रीड कारची खरेदी करणे हा योग्य पर्याय ठरेल. Car
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.cardekho.com/new-cng+cars
हे पण वाचा :
RBI कडून ‘या’ बँकेचे लायसन्स रद्द, आता खातेदारांच्या पैशांचे काय होणार ???
Indian Bank ने सुरु केली स्पेशल FD योजना, नवीन व्याज दर पहा !!!
Post Office च्या FD मध्ये आकर्षक व्याजदरासोबतच मिळतात ‘या’ सुविधा
Stock Market मधील ‘या’ सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली 1.33 लाख कोटी रुपयांची वाढ