Car Discount Offer : चारचाकी घेण्याचं स्वप्न असेल तर 31 डिसेंबरपर्यंत घ्या निर्णय; ‘या’ गाड्यांवर 1.50 लाख…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Car Discount Offer : कोरोना काळानंतर स्वतःचे वाहन घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. आता कंपन्यांकडूनही नवीन वाहनांसाठी अनेक आकर्षक ऑफर दिल्या जात आहेत. जर आपल्याली स्वस्तात चांगली कार घ्यायची असेल तर आता एक मोठी संधी चालून आली आहे. कारण सध्या अनेक वाहन कंपन्या आपल्या कारवर मोठी सूट देत आहेत. जर आपण 31 डिसेंबरपर्यंत कार खरेदी केली तर आपल्याला 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या बचतीचा फायदा मिळू शकेल. चला तर मग कोणत्या कंपन्या चांगली ऑफर देत आहेत ते जाणून घेउयात…

i20 Highlights | Cars - Hyundai Worldwide

Hyundai कारवर मिळेल सर्वाधिक सूट

हे लक्षात घ्या कि, Hyundai कंपनीकडून आपल्या Aura, Grand i10 Nios, Kona इलेक्ट्रिक आणि i20 मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जाते आहे. Hyundai कडून Grand i10 Nios वर 63,000 रुपयांपर्यंत, i20 वर 30,000 रुपये आणि Aura वर 43,000 रुपयांपर्यंतची सूट दिली जाते आहे. त्याचबरोबर Hyundai इलेक्ट्रिक कार Kona च्या खरेदीवर ग्राहकांना जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंतची सूट दिली जाते आहे. Car Discount Offer

New Honda WR-V SUV unveiled; India launch being studied | Autocar India

Honda कारवर मिळेल 72,000 ची सूट

जपानी कंपनी असलेल्या Honda कडूनही ग्राहकांना आपल्या कारवर विविध ऑफरदेण्यात येत आहेत. कंपनीकडून मध्यम आकाराच्या कॉम्पॅक्ट SUV Honda WR-V (पेट्रोल) वर भरपूर सूट दिली जात आहे. या कारवर ग्राहकांना 72,340 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकेल. याशिवाय Honda WR-V, Honda Jazz, Honda City 4th Generation आणि 5th Generation New Honda Amaze कारच्या खरेदीवर देखील अनेक प्रकारच्या ऑफर मिळणार आहेत. Car Discount Offer

New Renault Kwid Launched In India For INR 4.49 Lakh | The Financial Express

Renault कारवरील उत्तम ऑफर

ग्राहकांना ऑफर्स देण्यात Renault कंपनी देखील मागे नाही. या कंपनीकडून आपल्या किगर आणि ट्रायबर करवर 50,000 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. त्याच वेळी, Renault Kwid वर 35,000 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. Car Discount Offer

Tata Tiago Price - Images, Colours & Reviews - CarWale

Tata Motors कडून मिळणार इतकी सूट

जास्तीत जास्त स्टॉक काढण्यासाठी टाटा मोटर्सकडूनही ग्राहकांना विविध वाहनांवर अनेक ऑफर दिल्या जात आहे. हे लक्षात घ्या कि, टाटा मोटर्सच्या सफारी, हॅरियर, टियागो आणि टिगोर वाहनांवर जास्तीत जास्त ऑफर उपलब्ध आहेत. यापैकी कोणत्याही कारच्या खरेदीवर 65,000 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. मात्र ही सूट 31 डिसेंबरपर्यंतच उपलब्ध असेल. त्यानंतर सर्व वाहने जुन्या दरानेच उपलब्ध होतील. Car Discount Offer

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://cars.tatamotors.com/shopping/offers

हे पण वाचा :
FD Rates : ‘या’ दोन बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 9% पेक्षा जास्त व्याज
Gold Price Today : सोन्या-चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर
IDBI Bank मध्ये हिस्सेदारीसाठी ‘या’ 3 कंपन्यांनी दाखविला रस, शेअर्सने गाठली 52 आठवड्यांची सर्वोच्च पातळी
Renault India : नवीन वर्षात वाढणार गाड्यांची किंमत; Car Loan ही होणार महाग
आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका