प्रवाशांसह पाण्यात वाहून गेली कार, पुण्यातील एस एम जोशी पुलावरील घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. मागच्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात प्रचंड मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. या पावसाने पुण्यात मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. पुण्यात मुठा नदीला पूर आला आहे. नदी पात्रातील भिडे पुलावर पाणी पाणी जमा झाल्याने पुलावरील अनेक गाड्या पाण्याखाली (car drawn in rain water) गेल्या आहेत. यापाठोपाठ आता एस एम जोशी पुलाखालील रस्त्यावरील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
रात्री 1 वाजून 46 मिनीटांनी एस एम जोशी पुलाखालील नदी पात्राच्या रस्त्यावर एक कार पाण्यात (car drawn in rain water) वाहून जात असल्याचे समजले. याची माहिती मिळताच एरऺडवणा केंद्राची मदत पोहचताच दलाच्या जवानांनी रोप, लाईफ जॅकेटच्या साह्याने नदी पात्रात उतरून टाटा टिगोरो या गाडीजवळ जात गाडीमध्ये अडकलेल्या पाच व्यक्तींना (car drawn in rain water)सुखरूप बाहेर काढलं.

काय घडले नेमके ?
सविस्तर माहिती अशी कि सदर गाडी आणि गाडीतील व्यक्ती मूळच्या पालघर येथील असून पुण्यात नातेवाईकांकडे आले होते. ते रजपूत विटभट्टीकडून कारमध्ये पात्रातील रस्त्याने जात असताना पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांची गाडी वाहून जात (car drawn in rain water) गरवारे पूलाखाली अडकली होती. दलाच्या जवानांनी त्वरित समयसूचकता दाखवत गाडी जवळ पोहचत आत अडकलेल्या व्यक्तींची सुखरूप सुटका केली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर