…तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात फडकणारा तिरंगाही शरमेने खाली झुकेल !; ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर सामनातून हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्यावतीने स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त ‘हर घर तिरंगा’ हि संकल्पना राबविली जात आहे. अशात महाराष्ट्रात शिंदे-फडणवीसांचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपच्या अनेक नेत्यांना घोटाळा प्रकरणात दिलासा दिला जात असल्याने यावरून शिवसेनेच्या सामनातील अग्रलेखातून हल्लाबोल करण्यात आलेला आहे. ‘राजकीय विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी तपास यंत्रणांचा दुरुपयोग करायचा, पण स्वतःचे सर्व अपराध आणि घोटाळे ‘दिलाशा’च्या टोपीखाली झाकून ठेवायचे. पंतप्रधान मोदी यांचे ‘स्वच्छ भारत अभियान’ हेच असेल तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात फडकणारा तिरंगाही शरमेने खाली झुकेल, अशी टीका सामनातून उद्धव ठाकरेंनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी सामनातून घोटाळा प्रकरणात सूट दिलेल्या नेत्यांवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी अग्रलेखात म्हंटले आहे की, केंद्रीय तपास यंत्रणांच्या खंडणीखोरीचा तपास करणारी ‘एसआयटी’ शिंदे-फडणवीस सरकारने बरखास्त केली. नवनीत राणा यांचे लकडावालांशी असलेले कागदोपत्री आर्थिक व्यवहार ‘मनी लॉण्डरिंग’ प्रकरणातच मोडतात, पण केंद्रीय तपास यंत्रणा या ‘लॉण्ड्री’वाल्यांना चौकशीलाही बोलवायला तयार नाहीत.

ज्यांच्यावर खून, बलात्कार, आर्थिक घोटाळे व ईडीच्या चौकशा सुरू होत्या ते सर्व भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये घुसळून स्वच्छ झाले आहेत. पण यामुळे आझादीचा अमृत महोत्सव मात्र कलंकित आणि गढूळ झाला आहे. राज्यात नवे सरकार आल्यापासून भाजपच्या घोटाळेबाजांना एक तर ‘क्लीन चिट’ मिळत आहे, नाहीतर हायकोर्टातून ‘दिलासा’ मिळत आहे. सत्य, न्याय व लोक भावनांचा इतका अनादर कधीच झाला नव्हता, असे सामनातून म्हंटले आहे.