बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलढाणामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये चालती कार विहिरीत कोसळल्याने (car fell into well) पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच या भीषण दुर्घटनेत पतीदेखील गंभीर जखमी झाला आहे. यादरम्यान मायलेकीच्या रेस्क्यू दरम्यान एका 24 वर्षीय युवकाने विहिरीत उडी (car fell into well) टाकली. पवन पिपळे असे विहिरीत उडी घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. या युवकाचा शोध सुरू आहे.
काय घडले नेमके?
देऊळगाव राजा येथील रामनगरमध्ये राहणारे शिक्षक अमोल मुरकुट हे आपली पत्नी स्वाती मुरकुटला कार शिकवत होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सिद्धी मुरकुट देखील होती. दरम्यान, कार शिकवित असताना चिखली रोडवर जात असताना कार वरील ताबा सुटल्याने कार सरळ विहिरीमध्ये (car fell into well) पडली. या दुर्घटनेत पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला तर पतीला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
या दुर्घटनेत अमोल मुरकुट खिडकीमधून कसेबसे बाहेर आले. मात्र, स्वाती मुरकुट व मुलगी सिद्धी मुरकुट यांना गाडीतून बाहेर पडता न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी (car fell into well) मृत्यू झाला. अमोल मुरकुटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून स्वाती मुरकुट व सिद्धी मुरकुट यांचा विहिरूतून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी