वाळूज : के – 129 सेक्टरमधील व्ही. इंडस्ट्रीजला मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत यंत्रासह तयार केलेला कच्चा माल जाळून खाक झाला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज मालकाने केला आहे.
संजय आहिरे (रा. विटखेडा) व संदीप डहाळे ( रा. औरंगाबाद ) या दोघांनी भागीदारात के सेक्टरमध्ये व्ही. व्ही. इंडस्ट्रीज व एम सेक्टरमध्ये श्री पॅकेजिंग कंपनी आहेत. पुठ्ठयाचे बॉक्स तयार करणाऱ्या व्ही व्ही इंडस्ट्रीज कंपनीतून दुपारी धूर निघत असल्याचे सुरक्षारक्षक नाथा चव्हाण यांच्या मुलाच्या लक्षात आले.
चव्हाण यांनी ही माहिती मालकांना दिली. अहिरे यांनी ही माहिती मालकांना दिली. अहिरे यांनी अग्निशमन दलाला फोन करताच वाळूज एमआयडीसीचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र आग विझवण्यासाठी चार तास लागले. यंत्रसामग्री, कच्चा व तयार माल खाक झाल्याने 15 लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज मालकाने वर्तवला.