कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
विदेशी भाषा विभागातील ‘कार्निव्हल-२०२०’ या कला-सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप विदेशी भाषांतील सुरेल गीते, समूह गीते, युद्ध गीते, लोक नृत्य, प्रसंग नाट्य सादरीकरण अशा बहारदार कला आविष्काराने संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी रशियन, जर्मन, जपानी व पोर्तुगीज भाषांतील विविध स्वरूपाचे खेळ, भाषिक कौशल्य उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कलाविष्कार सादर केले.
यातून प्रेक्षकांना रशियन, जपानी, जर्मन व पोर्तुगीज संगीत व नृत्य, तसेच विविध उत्सवांद्वारे प्रकट होणारे त्यांचे जनजीवन यांचा परिचय झाला. हस्तलेखन स्पर्धांचे विजेते मैत्रेयी कुलकर्णी, साक्षी मेथे (रशियन), तनय कोळेकर (जर्मन) व ज्योत्स्ना भाटवडेकर व दीपिका भोसले (जपानी) यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. मेघा पानसरे, स्नेहा वझे, स्नेहल शेट्ये, शीतल कुलकर्णी व प्रियांका माळकर यांनी मार्गदर्शन केले.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.