ST मध्ये होणार Cashless व्यवहार; प्रवाशांना मोठा फायदा

ST Cashless payment
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  ST महामंडळ आपल्या प्रवाश्यांसाठी नेहमीच काही ना काही नवीन सुविधा आणत असते. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. एसटी ही सामान्य लोकांच्या खिशाला परवडणारे प्रवासाचे साधन आहे. म्हणून एसटीच्या सुविधेत भर घालण्यासाठी एसटी महामंडळाने रोकड विरहित सेवा उपलब्ध करून दिली आहे. ती कशी ते जाणून घेऊयात.

आता होणार कॅशलेस व्यवहार

सध्या डिजिटल माध्यमाचे युग सुरु असून सर्व व्यवहार हे कॅशलेस होत आहेत. त्यामुळे रा. प. महामंडळाद्वारे नवीन अ‍ॅन्ड्रॉईड ETI मशिन सर्व आगारात कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सध्याच्या माहिती व तंत्रज्ञान युगात सर्वत्र रोकड विरहित (Cashless) व्यवहार करण्यात येत आहे. त्यामुळे आता एसटीनेही हा मार्ग निवडला आहे.

UPI QR कोडद्वारे काढता येणार तिकीट

एसटी महामंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवश्यांना याचा फायदा होईल अशी आशा आहे. यामध्ये एसटी बसेसमध्ये तुम्हाला UPI QR कोडद्वारे पैसे द्यावे लागणार आहेत. हा एसटीद्वारे करण्यात आलेला पहिला टप्पा आहे. तर याच्या पुढच्या टप्प्यात डेबिट व क्रेडिट कार्ड द्वारे व्यवहार होणार आहे . या नवीन निर्णयाबाबत सर्व विभागीय कार्यालयांना सूचित करण्यात आले आहे. तसेच क्यूआर कोड वापरासंबंधी वाहकांनाही मार्गदर्शन करण्यात आले आहे.  त्यामुळे तिकीट काढण्यासाठी वाहकांची होणारी फजिती कोठेतरी कमी होईल आणि त्याचा फायदा प्रवाश्यांना होईल. अशी आशा व्यक्त केली जात आहे.