हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये रस्ते अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या प्रमाणात घट होण्यासाठी सरकार लवकरच रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना मोफत उपचार सुविधा देणार आहे. यामुळे रस्ते अपघातातील व्यक्तींचे प्राण वाचू शकते. पुढील चार महिन्यात सरकारकडून देशात कॅशलेस उपचार सेवा सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेअंतर्गतच जखमींना मोफत उपचार सेवा पुरवली जाणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार गेल्यावर्षी राज्यात 4.46 लाख रस्ते अपघात झाले आहेत. ज्यात 4.23 लाख लोक जखमी झाले असून 1.71 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सरकारने सर्व देशांमध्ये कॅशलेस उपचार प्रणाली लागू करण्याचं आवाहन आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाला केले आहे. याबाबतची माहिती मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.
महत्वाचे म्हणजे, रस्ते अपघाताच्या प्रमाणात घट होण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये रस्ता सुरक्षा अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये या नव्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात येणार आहे. त्यासोबतच भारत एनसीएपीही राबविला जाणार आहे. यामध्ये सीट बेल्ट रिमाइंडर आणि वाहनांमधील तांत्रिक बदल या सर्व गोष्टींचा समावेश असेल.