हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जात प्रमाणपत्राबाबत (Caste Certificate) राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने जात प्रमाणपत्र ऑनलाइन प्रणालीसाठी हिरवा कंदील दिला असून, लवकरच ही सुविधा प्रत्यक्षात येणार आहे.त्यामुळे तुम्हाला अवघ्या एका क्लीकवर तुमच्या जातीचे प्रमाणपत्र काढता येणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा ग्रामीण भागातील नागरिकांना खास करून फायदा होईल, हजारो अर्जदारांचा वेळ आणि मेहनत वाचेल आणि भ्रष्टाचारालाही आळा बसेल.
खरं तर नवीन कॉलेज ऍडमिशन, सरकारी नोकरी, सरकारी योजनांचा लाभ, निवडणूक आरक्षण इत्यादीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांना जात प्रमाणपत्राची (Caste Certificate) आवश्यकता असते. मात्र जात प्रमाणपत्र मिळवताना अर्जदारांना मोठ्या अडचणीना सामोरं जावं लागतं. कार्यालयात सतत चकरा माराव्या लागतात, वेळ तर जातोच जातो, परंतु पैसेही खर्च होतात. एवढं सगळं करूनही जात प्रमाणपत्र वेळेत मिळत नाही. त्यामुळे यावर आता सरकारने तोडगा काढला आहे. जात प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया जलद आणि पारदर्शक व्हावी यासाठी संगणकीय ऑनलाइन प्रणाली विकसित केली जाणार आहे. सरकारने यासाठी हिरवा कंदील दाखवला असून लवकरच हि सिस्टीम सर्वसामान्यांच्या वापरात येईल.
ही समस्या सोडवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांनी एकत्रितपणे संगणकीय प्रमाणी विकसित करण्याचा प्रस्ताव तयार केला. या संदर्भातील बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व विभागांना १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते.
नव्या सिस्टीमची वैशिष्ट्ये काय? Caste Certificate
या नव्या सिस्टीम मध्ये नागरिकांना अर्ज करताना मार्गदर्शन करणाऱ्या नियमाधारित इंटरफेसची मदत होईल.
अर्ज प्रक्रिया अधिक सोप्पी व्हावी यासाठी या नव्या सिस्टीम मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर केला जाईल
अर्जदाराचे नाव, वडील किंवा पतीचे नाव आणि आधार कार्डमधील मूळ पत्ता या सर्व गोष्टी प्रणालीद्वारे तपासल्या जातील.
कागदपत्रे थेट DIGILocker वरून घेतले जातील.
महिनाभर चालणारी प्रक्रिया अगदी तासाभरात होईल.
कोणत्या वर्गाला फायदा होणार
१) अनुसूचित जाती (SC)
२) अनुसूचित जमाती (ST)
३) भटक्या आणि विमुक्त जमाती
४) इतर मागासवर्गीय (OBC)
५) विशेष मागास प्रवर्ग