औरंगाबाद | बकरी ईदमुळे शहरात सर्वत्र नाका-बंदी लावण्यात आली आहे. सिल्लेखाना येथे अवैधपणे आणण्यात येणाऱ्या अकरा जनावराचा टेम्पो क्रांती चौक पोलिसांनी विभागीय ग्रंथालया समोर शनिवारी सकाळी 9 वाजता पकडला आहे.
सिल्लेखाना चौकाकडे एका वाहनातून कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती क्रांती चौक पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना त्यांच्या एका खबरीकडून मिळाली. यानुसारच पोलिसांच्या पथकाला सावरकर चौकामध्ये एक टेम्पो दिसून आला. (एम. एच 17, टि.8201) या टेम्पोला पोलिसांनी थांबवले तेव्हा चालकाने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी टेम्पोचा पाठलाग करून शासकीय ग्रंथालय जवळ टेम्पोला पकडले यात एकजण पळून गेला.
टेम्पो चालकाला पकडले आणि टेम्पोची तपासणी केली. तेव्हा त्यामध्ये 11 जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचे दिसून आले. पोलीस पक्षाचे प्रमुख एपीआय सूर्यतळ यांनी टेम्पोचा पंचनामा करून 11 जनावरांसह एकूण 4 लाख 23 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. टेम्पोचा चालक फैजल खान फिरोज खान, वय 29(रा. इंदिरानगर ,न्यु बायजीपुरा) याची विचारपूस केली असता, ही जनावरे मुजाहेद खान नासिर खान रा. सिल्लेखाना यांची असल्याचे त्याने सांगितले. दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पकडलेली जनावरे बेगमपुरा भागातील गुरुगणेश गोशाळा येथे संगोपनना करिता देण्यात आली आहेत.




